Arambol Murder Case: हरमल खून प्रकरणात नवा ट्विस्ट; Postmortem रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा, संभ्रम वाढला

Goa Murder Case: अमर दत्ताराम बांदेकर याच्या शवविच्छेदन अहवालाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने काढल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.
Arambol Murder Case
Goa Beach Shack Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Arambol Beach Shack Murder Case

हरमल: हरमल-खालचावाडा येथील अमर दत्ताराम बांदेकर खून प्रकरणात अमर याच्या शवविच्छेदन अहवालाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने काढल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.

शवविच्छेदन अहवालात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे निदान केले आहे. मात्र, मारहाणीमुळे तसेच डोके व अन्य शरीरावर खोल जखमा झाल्याने अमरचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले आहे.

काही बातम्यांमध्ये चुकीची माहिती दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. मात्र, या घटनेच्या अहवालाबाबत गैरसमज झाले तसेच फेक न्यूजवर विश्वास ठेवू नये, असे तपास अधिकारी कुणाल नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, या खून प्रकरणी आणखीन दोघांना मांद्रे पोलिसांनी अटक केल्याने, आता एकूण तीनजणांना अटक करण्यात यश मिळाले. रविवार, २६ रोजी सायंकाळी ६ वा.च्या सुमारास किनाऱ्यावर फिरण्यास गेलेल्या अमर बांदेकर याचा मारहाण केल्याने मृत्यू झाला व पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. सुरींदर कुमार (हिमाचल प्रदेश) यास गुन्हा घडल्याच्या रात्री तर ललित ठाकूर व बिभिषण कुमार (दोन्ही हिमाचल प्रदेश) यांना पुराव्यानिशी २७ रोजी रात्री अटक केली आहे.

या प्रकरणातील तिन्ही संशयित हे शॅकवर काम करीत होते व सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या हालचाली कैद झाल्याने या प्रकरणात न्याय मिळेल, अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली.

परवाना रद्द करा

पेडणे तालुक्यातील ही घटना दुःखद असून पर्यटन हंगामात घडल्याने तसेच परप्रांतीय लोकांनी एका गोमंतकीय युवकाचा हकनाक बळी घेतल्याने गोमंतकीय जनता संतप्त आहे. या ‘शॅक’चा परवाना रद्द करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक सुशांत पेडणेकर यांनी व्यक्त केले.

Arambol Murder Case
Arambol Murder Case: हरमल खून प्रकरण! हिमाचल प्रदेशच्या दोघांना अटक

सरकारने कुटुंबाला आधार द्यावा

अमर बांदेकर लहान असताना त्याचे वडील दत्ताराम बांदेकर यांचे निधन झाले होते. त्यावेळेपासून त्याच्या आईने (उषा) काबाडकष्ट करून, मासे विक्री करून दोन पुत्र व एक कन्या यांचा सांभाळ केला. मात्र, आता त्यांचा कमावता आधार हरपला असल्याने सरकारने त्यांच्या कुटुंबास आधार द्यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Arambol Murder Case
Arambol Murder Case: हरमल खून प्रकरण! हिमाचल प्रदेशच्या दोघांना अटक

खुर्च्या, पलंग हटले; शिस्तीची अपेक्षा

अमर बांदेकर खून प्रकरणानंतर हरमल समुद्रकिनाऱ्यावर शांतता नसली तरी पर्यटकांना पूर्ण मौजमाजा करण्याचे उपयुक्त वातावरण होते, असे दिसून आले. मात्र, पर्यटन हंगाम संपेपर्यंत अशीच स्थिती राहो, अशी अपेक्षा अनेक पर्यटकांनी व्यक्त केली. मंगळवारी सायंकाळी किनाऱ्यावर फेरफटका मारला असता बरेच बदल घडून आल्याचे आढळले. यात पर्यटन विभागाकडून प्रत्येक शॅकला केवळ पंधरा मीटर जागेत टेबल्स, खुर्च्या व पलंग मांडण्याची परवानगी नव्हे सक्ती केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com