Arambol Spa Massage Parlors: हरमलातील स्पा व मसाज पार्लर बंद करण्याचा ठराव, सभेत ग्रामस्थांनी व्यक्त केल्या संतप्त भावना

Arambol Gram Sabha Resolution: स्पा आणि मसाज पार्लरमध्ये राजरोसपणे अनैतिक प्रकार सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ते व्यवसाय पूर्णत: बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव आजच्या ग्रामसभेत एकमताने संमत केला.
Arambol Spa Massage Parlors
Arambol Spa Massage ParlorsDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: हरमल पंचायत क्षेत्रातील काही स्पा आणि मसाज पार्लरमध्ये राजरोसपणे अनैतिक प्रकार सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ते व्यवसाय पूर्णत: बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव आजच्या ग्रामसभेत एकमताने संमत केला. या प्रकारामुळे गावातील महिलांना प्रचंड मनस्ताप होत असून गोव्यातील नामांकित पर्यटनस्थळाची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ग्रामसभेत स्पा व मसाज पार्लरमध्ये अनैतिक व्यवसाय चालत असल्याचा मुद्दा उपस्थित करत पंचसदस्यांनी ग्रामस्थांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. पीटर कार्दोझ आणि जॉकी रॉड्रिग्स यांनी हा ठराव मांडला. अशा प्रकारांचा पूर्णत: नायनाट करण्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

Arambol Spa Massage Parlors
Goa Education: नव्या शैक्षणिक वर्षापासून दहावीचा अभ्‍यासक्रम बदलणार, पहिली ते दहावी या सर्वच इयत्तांसाठी 'NEP'ची अंमलबजावणी

यावेळी झालेल्या चर्चेत टोनी डिमेलो, एडविन डिसोझा, इनासियो डिसोझा, बॉस्को फर्नांडिस, क्लाऊड फर्नांडिस, राफाएल फर्नांडिस, संतोष कोरकणकर, मॅथ्यू फर्नांडिस, हेमंत फर्नांडिस, प्रवीण वायंगणकर आदींनी सहभाग घेतला.

Arambol Spa Massage Parlors
Goa Trekking Records: छोट्या पावलांची मोठी झेप! 6 वर्षांच्या अन्वीने अवघ्या 7 तासांत सर केले 'सोनसोगर शिखर'

यापूर्वी ग्रामस्थांनी येथील मसाज पार्लरमध्ये चालणारे अनैतिक व्यवहार बंद पाडून तेथील मुलींना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याप्रकरणी काही पोलिसांवरही कारवाई झाली असून हे व्यवसाय पूर्णत: बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com