Arambol Gram Sabha: हरमल ग्रामसभा 40 मिनिटांत आटोपली, सभेला अल्प प्रतिसाद; घरपट्टी व निरीक्षक नियुक्तीवर नाराजी

Arambol Inspector Appointment: रविवारी झालेली हरमल पंचायतीची ग्रामसभा अवघ्या ४० मिनिटांत आटोपल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले.
Arambol Gram Sabha
Arambol Gram SabhaDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: रविवारी झालेली हरमल पंचायतीची ग्रामसभा अवघ्या ४० मिनिटांत आटोपल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले. सभेला अल्प प्रतिसाद मिळाला.

केवळ दोन लिखित ठराव व सूचना आल्याने सभा लवकर संपली. मात्र, ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा करता आली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

Arambol Gram Sabha
Goa Assembly Session: बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था '39-अ'चा हिशेब 3 दिवसांत; अधिवेशनास सोमवारपासून प्रारंभ, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही कसोटी

सरपंच दिव्या गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पंचायत सचिव रजत नार्वेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यालगतची आस्थापने व घरांच्या नोंदींबाबतही चर्चा झाली.

नागरिक रोहित नाईक यांनी घरपट्टीचा मुद्दा उपस्थित करून, सरकारने घरांसाठी १० रुपये व आस्थापनांसाठी १५ रुपये प्रतिचौरस मीटर शुल्क निश्चित केले असताना हरमल पंचायत ४० रुपये शुल्क कोणत्या आधारावर आकारते, असा सवाल केला.

ग्रामसभेला उपसरपंच सोनाली माज्जी, पंच अनुपमा मयेकर, संतान फर्नांडिस, प्रजॉय फर्नांडिस, सुशांत गावडे, गुणाजी ठाकूर, भिकाजी नाईक, रजनी इब्रामपूरकर आदी मान्‍यवर उपस्थित होते.

Arambol Gram Sabha
Goa Sports: 'गोव्यातून ऑलिंपियन घडवायचाय'; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मोठे लक्ष्य, क्रीडा शिक्षकांना संघटनांशी समन्वय साधण्याचे आवाहन

वाचनालयातील कर्मचारी निरीक्षक!

ग्रामसभेसाठी केरी पंचायत वाचनालयातील कर्मचारी राजाराम मठकर यांना निरीक्षक म्हणून पाठविण्यात आल्याने ग्रामस्थांनी गटविकास खात्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com