Arambol Accident: हरमल येथे दिल्लीच्या मद्यधुंद चालकाचा थरार! मुंबईच्या पर्यटकास चिरडले; कार, स्कूटर, वीज खांबाला दिली धडक

Arambol Accident Death: खालचावाडा-हरमल येथे पार्किंग तळावर दिल्लीस्थित मद्यपी जीपचालकाने मुंबईतील निवृत्त कर्मचाऱ्यास निर्घृणपणे चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Arambol Accident Death
Arambol Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: खालचावाडा-हरमल येथे पार्किंग तळावर दिल्लीस्थित मद्यपी जीपचालकाने मुंबईतील निवृत्त कर्मचाऱ्यास निर्घृणपणे चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी मद्यधुंद चालकाने अन्य काही वाहनांना ठोकरल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास एक मद्यधुंद इसम जीए-०३-एएच- ५२६४ या क्रमांकाची भाड्याची थार जीप बेधुंदपणे चालवित होता. किनाऱ्यावरून जाताना त्याने कदम यांचा चिरडल्यानंतर तिथे पार्क केलेल्या दोन स्विफ्ट कार, ॲक्टिव्हा स्कूटर, तसेच वस्त यांच्या मालकीच्या जीपला धडक देऊन थार जीप वीज खांबाला धडक देऊन थांबली.

Arambol Accident Death
Assagao House Demolition: आसगाव घर मोडतोड प्रकरण, क्राईम ब्रँचकडून आरोपपत्र दाखल; मास्टरमाईंड पूजा शर्माला ‘क्लीन चीट’

या सर्व वाहनांचे मिळून सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हे पर्यटक जीप घेऊन किनाऱ्यावर आले होते. त्यांच्या जीपमध्ये बियरच्या बाटल्या आढळल्या. मद्यपानामुळे त्यांना धड उभे राहताही येत नव्हते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी थार जीपमधील सर्व पर्यटकांना ताब्यात घेतले तसेच असून हनुमंत यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला आहे.

Arambol Accident Death
Verca Crime: युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, सळ्यांनी वार; वार्का अपहरण प्रकरणातील फरारी संशयिताला अटक

मित्रांना अश्रू अनावर

हनुमंत कदम ( वय ७१ वर्षे, रा. दादर- मुंबई) हे आठ मित्रांसह गोव्यात पर्यटनासाठी आले होते. हनुमंत हे चालत मुख्य रस्त्यावर येत असता, त्यांना मागून आलेल्या थार जीपने उडविले. जीप त्यांच्या अंगावरून पुढे गेली. नंतर या जीपने इतर वाहनांनाही ठोकरले. हनुमंत यांच्या मित्रांनी हा दुर्दैवी प्रसंग डोळ्यांसमोर पाहिला आणि त्यांना रडू कोसळले. जीपचालक अरविंद सिंग रावत याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com