Dr. Pramod Sawant
Dr. Pramod Sawant Dainik Gomantak

Dr. Pramod Sawant ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे मुख्यमंत्री; वाचा माजी मुख्‍यमंत्र्यांचा सत्तेवरील कालावधी

डॉ. सावंत यांना भाजपचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहण्याचा मान
Published on

Dr. Pramod Sawant माजी मुख्‍यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्‍या निधनानंतर मुख्यमंत्री बनलेले डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपसाठी नवा विक्रम केला आहे. सलग सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सर्वांना आज मागे टाकले.

19 मार्च 2019 पासून मुख्यमंत्रिपदी राहून डॉ. सावंत यांनी राज्यातील भाजपतर्फे सर्वाधिक काळ म्‍हणजेच 4 वर्षे आणि 102 दिवस मुख्यमंत्री राहण्याचा मानही मिळवला.

पर्रीकरांच्‍या अचानक निधनानंतर मुख्यमंत्री कोण, या विषयावरून वाढलेला वाद भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी निकाली काढून तत्कालीन सभापती डॉ. सावंत यांच्‍यावर राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली.

भाजपचे माजी मुख्‍यमंत्री व कालावधी

  • दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर २००२ ते २००५ या काळात सलगपणे ४ वर्षे १०१ दिवस मुख्यमंत्री होते. त्यांचे सरकार पाडल्यानंतर काँग्रेसचे सरकार आले. काँग्रेसचे शासन २०१२ पर्यंत राहिले.

  • मार्च २०१२मध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळाली. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाले; पण यावेळीही ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. केंद्रात चांगल्या नेत्यांची गरज होती, त्यामुळे त्यांना दिल्लीत बोलावणे आले.

  • ९ मार्च २०१२ ते ८ नोव्हेंबर २०१४ पर्यंत पर्रीकर २ वर्षे आणि २४४ दिवस मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर भाजपने ज्येष्ठ नेते प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मुख्यमंत्रिपदी नियुक्त केले. पार्सेकर २ वर्षे १२३ दिवस गोव्याचे मुख्यमंत्री राहिले.

Dr. Pramod Sawant
Goa Crime: धक्कादायक! माय-लेकाला नदीत ढकलून त्यांनी स्‍वत: घेतला गळफास, 'या' कारणास्तव उचलले शेवटचे पाऊल

मोठे यश: डॉ. सावंत यांनी गोव्यात भाजपला मोठे यश मिळवून देण्‍यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

ते मुख्यमंत्री झाल्यापासून जिल्हा पंचायत, पालिका, महापालिका, पंचायत, विधानसभा अशा सगळ्याच निवडणुकांमध्ये भाजपला आघाडी मिळाली आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात काँग्रेसमधील 10 जणांना आणि दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेसच्या 8 आमदारांना भाजपात आणून त्‍यांनी पक्ष मजबूत केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com