Ferry Boat: फेरीबोटीत तिकीटसाठी ॲपची सुविधा

Ferry Boat: दुचाकीस्वारांना पास: ‘क्यूआर कोड’ वरूनही भरता येणार शुल्क
Ferry Boat
Ferry BoatDainik Gomantak
Published on
Updated on

विलास ओहाळ

Ferry Boat: फेरीबोटीतून सध्या सरासरी पंधरा हजारांच्या आसपास दुचाकीस्वार ये-जा करतात. त्यामुळे या दुचाकीस्वारांना दहा रुपयांचे तिकीट आकारल्यास दररोज नदी परिवहन खात्याच्या माध्यमातून दीड लाख रुपयांचा महसूल मिळू शकतो.

Ferry Boat
Goa IT Company: स्टार्टअप, आयटी कंपन्यांना मिळाला बुस्ट

त्याचाच विचार करून या सेवेत बदल करण्यासाठी ॲपची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याशिवाय फेरीबोटीतून नियमित ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना पास पद्धतही सुरू केली जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्यात अठरा जलमार्गावर चालणाऱ्या फेरीबोटीत आत्तापर्यंत केवळ चार चाकी वाहनांना तिकीट आकारले जात होते. दुचाकीस्वार आणि प्रवासी यांना ही सेवा मोफत होती.

Ferry Boat
37th National Games 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मला सहभागी करून घेतले जात नाही श्रीपाद नाईक यांची नाराजी

दुचाकीस्वारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे फेरीबोटीतून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना तिकीट आकारण्यासाठी

नियमित ये-जा करणाऱ्यांची संख्या साधारण १२ ते १३ हजार दुचाकीस्वार आहेत. त्यांचाही विचार करून त्यांच्यासाठी दीडशे रुपये मासिक पास सेवा दिली जाणार आहे. याशिवाय नदी परीवहन खात्यातर्फे ॲप तयार केला जाणार आहे, त्याद्वारे दुचाकीस्वारांना मासिक पास काढता येणार आहे, त्याशिवाय वाहनधारकांना क्यूआर कोडच्या माध्यमातून तिकिटाचे पैसेही ऑनलाईनपद्धतीने भरता येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गेली काही दिवसांपासून नदी परिवहन खात्यातर्फे अठराही फेरीबोट मार्गावर किती दुचाकी ये-जा करतात, त्याचे निरीक्षण केले आहे. त्यातूनच दुचाकीस्वारांना तिकीट आकारण्याचा निर्णय जवळपास निश्‍चित झाला आहे. सरकार दरबारी याबाबत लवकरच अंमलबजावणी होण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत.

‘सीसीटीव्ही’ची राहणार नजर !

मोबाईल ॲपमुळे व्यवहार ऑनलाईन होत आहेत. परंतु प्रत्यक्षात किती वाहने फेरीबोटीतून ये-जा करतात, त्यावर नजर ठेवणे शक्य नाही. त्यामुळे सर्व फेरीबोटींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचेही निश्‍चित झाले असून, त्यांच्या माध्यमातून फेरीबोटीतील सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. यापूर्वी झालेले तिकीट घोटाळे पाहता या खात्याने सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही सूत्रांनी ‘गोमन्तक''ला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com