गेले काही दिवस गोवा राज्यात अॅप आधारित टॅक्सीच्या मुद्यावरुन राज्य सरकारमध्येच वेगवेगळ्या भुमिका घेतल्याचे पहायला मिळत आहे. यातच आज गोवा विधानसभेच्या नवव्या दिवशी मंत्री रोहन खंवटे यांनी यामूद्यावर भाष्य केले आहे. खंवटे म्हणाले की, गोवा राज्यात अॅप आधारित टॅक्सी आवश्यक आहे. कारण यामूळे गोव्यात येणाऱ्या लाखो पर्यंटकांना याचा फायदा होणार आहे. (APP BASED TAXI MUST FOR GOA - minister Rohan Khaunte )
तसेच पुढे बोलताना मंत्री खंवटे म्हणाले की, गोव्यात टॅक्सी सूविधेसाठी गोवा माइल्स प्रकारचे मॉडेल आवश्यक आहे. ज्याच्यामूळे टॅक्सी ऑपरेटर ग्राहकांकडून सुविधा शुल्क आकारत असताना टॅक्सी चालकांना त्यांच्या खिशातून पैसे दिले जात नाहीत. असे ते म्हणाले आहेत.
अॅप आधारित टॅक्सीच्या मुद्यावरुन राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या भुमिका
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अॅप आधारित टॅक्सीच्या मुद्यावर बोलताना असे म्हटले आहे की, काही ठिकाणी वाहन चालक विनामीटर टॅक्सी सेवा देत आहेत. त्यामूळे पर्यटकांकडून अधिक पैसे उकळण्यासारखे प्रकार घडू शकतात. असे निरिक्षण नोंदवले होते. तसेच मंत्री रोहन खंवटे यांनी ही अॅप आधारित टॅक्सीच्या मुद्यावरुन सर्वांचे एकमत असणे आवश्यक आहे.
असे म्हटले होते. तसेच राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी यावर बोलताना अॅप आधारित टॅक्सीला गोव्यात परवानगी देताना या प्रस्तावाचा पुन्हा एकदा विचार व्हावा असे म्हटले आहे त्यामूळे गोवा सरकर या मुद्यावरुन पुढे काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.