पणजी (Panaji) : माझ्या यशात माझ्या गुरुंचे मोठे योगदान आहे. माझे आई-बाबा आणि शिक्षक व्यंकटेश प्रभूदेसाई हेच माझे गुरु आहेत. दहावी होईपर्यंत जेईईची (JEE) परीक्षेची माहितीही नव्हती. अशी कोणती परीक्षा देण्याचा विचारही केला नव्हता. आई-वडील आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे जेईईची परीक्षा दिली आणि अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झालो. विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांनी माझे अभिनंदन केले, हे ऐकून खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया जेईईच्या परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या अन्वेश बांदेकर याने दिली. (JEE Mains Result 2022)
अन्वेषला दहावीमध्ये केंद्रीय विद्यालयात 97.4 टक्के गुण पडले होते. तर बारावीला गोवा बोर्डात 92.2 टक्के गुण मिळाले होते. आई-वडील आणि बहिणीसह एका खासगी क्लासेसचे संचालक व्यंकटेश प्रभुदेसाई यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे अन्वेषने सांगितले. पुढे काय करायचे, हे अद्याप ठरवलेले नाही. जेईईची पुढील परीक्षा झाली की, काय करायचे ते ठरवेन. माझे परिश्रम आणि अथक मेहनत आणि योग्य मार्गदर्शनामुळे मला या परीक्षेत चांगले यश मिळाले. माझ्या यशात आई-वडील, बहीण, शिक्षक यांच्यासह अनेकांना वाटा आहे. माझ्या यशाची दखल विधानसभेच्या अधिवेशनात घेतल्याने खूप बरे वाटले. याबद्दल मी मुख्यमंत्र्यांसह सभागृहाचे आभार मानतो, अशा शब्दात अन्वेषने आपला आनंद व्यक्त केला.
अन्वेशचे वडील संदीप बांदेकर (Sandeep Bandekar) हे जलस्रोत खात्यामध्ये अभियंता असून आई डॉक्टर आहे. तर मोठी बहीण एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात आहे. अन्वेशचे प्राथमिक शिक्षण केव्ही आयएनएस मांडवी या केंद्रीय विद्यालयात झाले. अकरावी आणि बारावीचे शिक्षण कुजिरा येथील मुष्टिफंड हायस्कूलमध्ये झाले.
जेईईची तयारी अकरावीपासून सुरू केली. याचे वर्ग सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असायचे. कोरोनामुळे ऑनलाईन अभ्यास केला. पण शिक्षकांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे तसेच त्यांनी वैयक्तिक लक्ष दिल्यामुळे जेईईची चांगल्या पद्धतीने तयारी करता आली. जेईईमध्ये सर्वोत्तम गुण मिळवणे हेच लक्ष्य होते, असंही अन्वेष बांदेकरने स्पष्ट केलं आहे. (JEE Mains Goa News)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.