राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांचा सण होणार गोड; 'या' दरात मिळणार 2 किलो साखर

नागरी पुरवठा खात्याचा निर्णय
Goa Govt will provide 2 kg sugar in AAY by 13.50 Rs. per kg
Goa Govt will provide 2 kg sugar in AAY by 13.50 Rs. per kgDainik Gomantak
Published on
Updated on

अंत्योदय रेशन कार्डधारकांना गोवा सरकारने सणानिमित्त दोन महिन्यासाठी दोन किलो साखऱ कमी दरात देण्याचे ठरवले आहे. नागरी पुरवठा खात्यातर्फे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांची मिळून प्रतीकार्डधारकाला एकूण दोन किलो साखर 13 रूपये 50 पैसे प्रतीकिलो दराने देण्यात येणार आहे.

नागरी पुरवठा आणि ग्राहक खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

(Goa Govt will provide 2 kg sugar in AAY by 13.50 Rs. per kg)

Goa Govt will provide 2 kg sugar in AAY by 13.50 Rs. per kg
Goa Police: राज्यातील 12 पोलिस निरीक्षकांची बदली; आस्थापना मंडळाने केली होती शिफारस

नागरी पुरवठा खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंत्योदय अन्न योजनेतील कार्डधारकांना दोन किलो साखऱ या दरात दिली जाणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या काळात गणेशोत्सव आणि दसरा हे महत्वाचे सण येत आहेत. त्या पार्श्वभुमीवर हा महत्वाचा निर्णय आहे.

ईपीओएस द्वारे ही साखर अंत्योदय कार्डधारकांना वितरित करावी, असे आदेश रास्त भाव धान्य दुकानांना सरकारने दिले आहेत. साखरेचा दर्जा देखील कार्डधारकांना दाखवला जावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

वितरणाबाबत, किंमतीबाबत किंवा साखऱेच्या प्रमाणाबाबत काही तक्रार असल्यास तालुका नागरी पुरवठा निरीक्षकांकडे किंवा गोवा सरकारच्या पुरवठा विभागाकडे तक्रार करता येईल, असेही विभागाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com