Goa Rationing Scam: रेशन घोटाळ्यातील मुख्य सुत्रधाराला सशर्त जामीन; क्राईम ब्रांचचा युक्तीवाद ठरला फोल

क्राईम ब्रांचचा युक्तीवाद ठरला फोल
Court
CourtDainik Gomantak

गोव्यातील धान्य तस्करी करत कर्नाटक राज्यात पळवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नोव्हेंबर 14 रोजी समोर आला आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यसुत्रधार सचिन नाईक व त्याचा साथिदार विरेंद्र मार्दोळकर याला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित नाईक याने अटक पूर्व जामीनासाठीअर्ज केला होता. त्याला आज न्यायालयाने मंजुरी दिली.

(Anticipatory bail granted to Sachin Naik the main suspect in the grain smuggling case in Goa)

Court
Goa Beach Music Party: 'त्या' नागरिकांना मिळाली तब्बल पंधरा वर्षानंतर शांत झोप; न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत

मिळालेल्या माहितीनुसार आज धान्य तस्करी प्रकरणातील मुख्यसुत्रधार सचिन नाईक व त्याचा साथिदार विरेंद्र मार्दोळकर याला न्यायालयाने सशर्त अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे क्राईम ब्रांचने जामिनासाठी केलेल्या विरोधाला अपयश आले आहे.

Court
Illegal Construction: गोवा खंडपीठाची धडक कारवाई; नियमबाह्य बांधकाम पाडण्याचा आदेश

क्राईम ब्रांचचा युक्तीवाद ठरला फोल

क्राईम ब्रँचने गतसुनावणीदरम्यान संशयित सचिन नाईक याच्या अटक पूर्व जामीनाला विरोध केला व म्हटले की, अनेक शासकीय गोदामातून धान्य उचलले गेले असल्याने, वेगवेगळ्या व्यक्तींनी एकत्र येत हा कट तयार केला आहे. याचा पर्दाफाश करण्यासाठी सचिन नाईकची चौकशी तातडीने होणे आवश्यक आहे.

क्राईम ब्रँचने दुसरे कारण न्यायालयाला असे दिले की, संशयित आरोपी नाईक हा गुन्हेगार असून त्याच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कट, पुरावे नष्ट करणे आणि खोटे वजन वापरून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर फोंडा पोलिसांनी 2012 मध्ये जीवनावश्यक वस्तू कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नाईक याला जामिन मिळू नये. मात्र न्यायालयाने आज दोघांचा अटक पूर्व जामिन मंजुर केल्याने क्राईम ब्रांचचा युक्तीवाद फोल ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com