इंडिगोच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; गोवा-इंदूर फ्लाईटची हायड्रॉलिक सिस्टीम लँड होण्यापूर्वी बिघडली, 140 प्रवाशांनी रोखले श्वास

Goa To Indore Flight Emergency Landing: पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला अंडरकॅरेजचा इशारा देणारा संदेश पाठवला. त्यानंतर, धावपट्टीभोवती अग्निशमन दलाच्या अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या.
Flight malfunction before landing | Indigo Airlines news
Goa Indore flight emergencyDainik Gomantak
Published on
Updated on

मध्य प्रदेश: दिल्लीतून गोव्याकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर आता गोव्यातून इंदूरला जाणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमान इंदूरमध्ये लँडिंग होण्यापूर्वी तांत्रिक बिघाड आल्यानंतर इमर्जन्सीचा संदेश पाठविण्यात आला. या विमानातून १४० प्रवासी प्रवास करत होते. सोमवारी (२१ जुलै) गोव्यातून फ्लाईट इंदूरच्या दिशेने जाताना ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या विमानाने (6E 813) दाबोळी विमानतळावरुन दुपारी ३:१५ वाजता इंदूरला उड्डाण केले. विमान इंदूरजवळ आल्यानंतर, लँडिंग करण्यापूर्वी, विमानाची हायड्रॉलिक सिस्टीम व्यवस्थित काम करत नाही, असे पायलटच्या लक्षात आले.

पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला अंडरकॅरेजचा इशारा देणारा संदेश पाठवला. त्यानंतर, धावपट्टीभोवती अग्निशमन दलाच्या अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या. सुरक्षा कर्मचारी देखील सतर्क झाले, परंतु सायंकाळी ५ वाजता विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

Flight malfunction before landing | Indigo Airlines news
PAN PAN PAN: 191 प्रवाशांना घेऊन गोव्याला निघालेल्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड येताच ओरडला पायलट, मुंबईत केलं इमर्जन्सी लँडिंग

विमानातील तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच १४० प्रवासी देखील घाबरले, पण विमानाचे सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अलिकडेच रायपूरला जाणाऱ्या एका विमानाचे इंदूरमध्येही आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. विमानाने इंदूरहून उड्डाण केले, परंतु तांत्रिक बिघाडामुळे अर्ध्या तासानंतर विमान पुन्हा इंदूर विमानतळावर आणण्यात आले होते.

तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती इंडिगो विमान कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. याप्रकरणी योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून, योग्य तपासणी केली जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. प्रवाशांना झालेल्या तसदीबाबत इंडिगोच्या वतीने  दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com