South Goa: दक्षिण गोव्यात शनिवारी वीज खंडित करण्याचा निर्णय तूर्तास मागे

अधीक्षक अभियंता राजीव सामंत यांनी गुरूवारी याबाबत आदेश जारी केला आहे.
South Goa
South Goa
Published on
Updated on

Annual Planned Power Shutdown: गोवा वीज खात्याच्या वतीने दक्षिण गोव्यात (South Goa) विविध ठिकाणी नियोजित वार्षिक दुरूस्ती आणि देखभाल केली जाणार होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.11) दक्षिण गोव्यातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित राहणार होता. दरम्यान, तूर्तास हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

Annual Planned Power shutdown in south goa postponed

अधीक्षक अभियंता राजीव सामंत यांनी गुरूवारी याबाबत आदेश जारी केला आहे. वार्षिक दुरूस्तीसाठी शनिवारी (दि.11) दक्षिण गोव्यातील वीजपुरवठा सकाळी 07 ते दुपारी तीन वाजेपर्यंत खंडित करण्याचे जाहीर करण्यात आले होते. पण, शिगमोत्सवामुळे वीज खात्याने हा निर्णय रद्द केला आहे. असे या आदेश नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, यासंबधित प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तपत्र आणि टीव्हीवर देखील बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. नवीन बदलाची दक्षिण गोव्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी अशी सूचना करण्यात आली आहे.

South Goa
Calangute: मध्यप्रदेशच्या फुकटचंद माजी मंत्र्याची गोव्यात रासलीला, कॉलगर्ल्सनी दिला बेदम चोप

जुना आदेश काय होता?

वीज खात्याच्या वतीने नियोजित वार्षिक देखभाल केली जाणार आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील शेल्डे येथील 220 केव्ही क्षमतेचे उपकेंद्र, कुंक्कळी येथील 220 केव्ही क्षमतेचे उपकेंद्र आणि वेर्णा येथील 110 केव्ही क्षमतेचे उपकेंद्र शनिवार (दि. 11 मार्च) रोजी बंद राहणार आहे. सकाळी 07.00 ते दुपारी 3.00 या कालावधीत संपूर्ण दक्षिण गोव्यात वीज पुरवठा बंद राहणार आहे. फोंडा तालुका मात्र यासाठी अपवाद असेल असे वीज खात्याने म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

South Korea former president sentenced
Power Outage Crisis
Goa Hospital Power Outage
Center Sanctioned ₹1,880 Cr for NH-66 4-Laning in South Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com