Anmod Ghat: ..पुन्हा निर्णय मागे! अनमोड घाट 15 सप्टेंबरपासून होणार खुला; वाढीव कालावधीस कडाडून विरोध

Goa Belgaum Road: अनमोड घाटातील गोवा हद्दीत असणारा डांबरी रस्ता चार जुलै रोजी खचल्याने मडगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांनी २ सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून बंद केला होता.
Anmod Ghat | Goa Belgaum Road
Anmod Ghat | Goa Belgaum RoadDainik Gomantak
Published on
Updated on

रामनगर: अनमोड घाटातील गोवा हद्दीत असणारा डांबरी रस्ता चार जुलै रोजी खचल्याने मडगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांनी २ सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून बंद केला होता. पण रस्ता कोसळलेला ठिकाणी काम झालेच नसल्याने गोवा पीडब्ल्यूडी विभागाने मडगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे आणखीन दोन महिन्याचा कालावधी वाढवुन मागितला.

याला विविध ट्रक असोसिएशन, नागरिकांनी विरोध दर्शवल्याने मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी १५ सप्टेंबरपासून अनमोड घाट मार्ग सर्व वाहनांना खुला केला आहे.

दरम्यान, दहा दिवसाच्या आत रस्ता कोसळलेल्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करून, एकेरी मार्गाने सर्व वाहनांना सोडण्याचा आदेश दिल्याने येथे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रस्त्याशेजारी पत्रे मारणे, स्पीड लिमिटचे फलक लावणे, घाटावरून व खालून दोन्ही बाजूने रस्त्या दिसण्यासाठी छोटी मोठी झाडे तोडणे, अशी कामे करण्यात येणार आहेत.

रस्ता कोसळलेल्या ठिकाणी मुख्य कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असून, दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत तेही काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बेळगाव-गोवा महामार्गावरील खानापूरपासून अनमोडपर्यंत काही प्रमाणात काम अर्धवट स्थितीत असून या मार्गावर असणारे रेल्वे ओव्हर ब्रिज तसेच छोटे-मोठे ब्रिज व सर्वात मुख्य असलेला अनमोड मार्गावरील साधु खत्रीनजीक असणारा ७४ नंबर हत्ती ब्रिज अर्धवट स्थितीत होता.

Anmod Ghat | Goa Belgaum Road
Anmod Ghat: अनमोड रस्त्याबाबत नवी अपडेट! 15 सप्टेंबरपासून होणार खुला; उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

दर हत्ती ब्रिजची रुंदी फक्त सहा मीटरची बनवण्यात येणार असल्याने सदर ब्रिजला विविध संघटनाने आक्षेप घातल्याने ब्रिजचे काम अर्धवस्थेचे ठेवले होते. आता महामार्ग विभागाला सदर ब्रिजची रुंदी नऊ मीटर बनवण्याची परवानगी मिळाल्याने या ब्रिजच्या कामाला प्रारंभ होणार आहे.

Anmod Ghat | Goa Belgaum Road
Anmod Ghat: अनमोड घाट महामार्ग आणखी दोन महिने बंद, प्रवाशांचा खोळंबा; गोवा-कर्नाटक वाहतुकीवर परिणाम

तर सदर ब्रिज बनवताना शेजारून रस्ता ही नसल्याने विभागातर्फे अडीच महिन्याचा रस्ता बंद करण्याबाबत कारवार जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी करण्यात येणार असून लवकरच कामाला सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com