Goa News : शौर्य पदकासाठी अंकुरकुमारची शिफारस : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

कुंभारजुवेच्या ‘रिअल हिरो’वर अभिनंदनाचा वर्षाव, एक लाखाचा धनादेश प्रदान
CM Sawant With Ankurkumar Sanjay
CM Sawant With Ankurkumar SanjayDainik Gomantak
Published on
Updated on

अंकुरकुमार या धाडसी विद्यार्थ्याला भेटून मला खूप आनंद झाला. त्याच्या शौर्याचा गोव्याला निश्चित अभिमान आहे. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्याचे कौतुक करताना म्हणाले.

अंकुरकुमार अर्जुन प्रसाद याने वेळीच धाडस दाखविले आणि तीन मुलांना कुंभारजुवेतील मांडवी नदीपात्रात बुडण्यापासून त्याने वाचवले. याबद्दल कौतुकाचे प्रतीक म्हणून त्याला एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी दिला.

याप्रसंगी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात उपस्थित होते. सुरुचे भाट-कुंभारजुवे येथे शनिवारी दुपारी ३.३० वा. गुलालोत्सवानंतर नदीत आंघोळीसाठी गेलेल्या तीन मुलांना बुडताना पाहिले आणि अंकुरकुमारने जीवाची पर्वा न करता तिघांचेही जीव वाचवले. याबद्दल ‘शौर्य’ पदकासाठी त्याची शिफारस करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली.

CM Sawant With Ankurkumar Sanjay
गोवा, कोची नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड्सचे होणार आधुनिकीकरण; संरक्षण मंत्रालयाचा 470 कोटी रुपयांचा करार

जुने गोवे पोलिसांकडूनही सत्कार

जुने गोवे पोलिस स्थानकात शुक्रवारी सकाळी अंकुरकुमारचा सत्कार करण्यात आला. सकाळी कुंभारजुवे शाळेतून पोलिसांनी अंकुरकुमारला आपल्या वाहनातून जुने गोवे येथे आणले आणि त्यांच्या शौर्याचे कौतुक केले.

भविष्यात धीटपणाने, धाडसाने जीवनात वाटचाल करण्याबाबत त्याला मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर, उपनिरीक्षक कीर्तीदास गावडे, मनोहर धुळापकर व इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

मान्यवरांकडून गौरव

विधानसभा संकुलात शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मंत्री गोविंद गावडे, बाबूश मोन्सेरात, आमदार प्रवीण आर्लेकर, विजय सरदेसाई, सुभाष फळदेसाई यांनी अंकुरकुमारच्या कामगिरीचे कौतुक केले. त्याचबरोबर बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी अंकुरकुमारला प्रशस्तिपत्र पाठवले आहे.

CM Sawant With Ankurkumar Sanjay
Goa Drugs Case: हडफडे येथे दीड लाखांचा गांजा जप्त, हणजूण पोलिसांची कारवाई

पालक-शिक्षकांतर्फे गौरव

कुंभारजुवे सरकारी प्राथमिक शाळेत पालक-शिक्षक संघातर्फे शुक्रवारी अंकुरकुमारचा गौरव करण्यात आला. शिक्षक वर्ग व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंकुरकुमारला स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

‘गोमन्तक’चे उपसंपादक संजय घुग्रेटकर म्हणाले, अंकुरकुमारच्या शौर्याचे कौतुक होत आहे; कारण त्याने धाडसाने तिघांना वाचवले. जीवाची पर्वा न करता तो इतरांसाठी धावला. अवघ्या वयाच्या 10 व्या वर्षी इतरांसाठी झटण्याची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. पण अशी वेळ विद्यार्थ्यांनी आपल्यावर येऊ देऊ नये. अनावश्‍यकरित्या पाण्यात जाऊ नये. पोहता येत नसेल तर पाण्यात उतरण्याची घाई करू नये.

यावेळी समाजकार्यकर्ते सुरेंद्र नाईक म्हणाले, अंकुरकुमारने दखल घेण्यासारखे काम केले. त्यामुळे तिघांचा जीव वाचला. त्याचा मित्रांबद्दल असलेला जिव्हाळा आणि स्नेह महत्त्वाचा आहे. एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती त्याच्यात आहे.

कुंभारजुवे प्राथमिक शाळेच्या पालकसंघातर्फे अंकुरकुमारचा गौरव करण्यात आला. दीक्षिता भोसले, समिधा गावस, गीता लिंगुडकर, तृप्ती मांद्रेकर, प्राची तारी यांनी अंकुरकुमारच्या धाडसाचे कौतुक केले. मनीषा सावंत यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका रविना भगत यांनी केले. अंकुरकुमारचे वडील अर्जुन प्रसाद आणि आई रिप्रतिमादेवी यावेळी उपस्थित होत्या.

कुंभारजुवे शाळेतील पहिली ते चौथीपर्यंत शिकणारे विद्यार्थी तासभर एका ठिकाणी शांतपणे अंकुरकुमारच्या गौरव कार्यक्रमाला उपस्थित होते. मान्यवरांच्या भाषणावेळी टाळ्यांच्या कडकडाटात अंकुरकुमारला छोट्या दोस्तांनी प्रोत्साहन दिले. कार्यक्रमानंतर तो मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगताच, त्याला हात उंचावून शुभेच्छा दिला. एकूणच त्याचे सवंगडी आपल्या कृतीतून मित्रांबद्दलचा अभिमान व्यक्त करत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com