Anjuna: मंत्री, आमदारांनी आश्‍‍वासने दिली, नवीन जलवाहिनी बसविली; हणजूण, कायसूववासीयांचा पाणीप्रश्न मात्र 'जैसे थे'

Anjuna Water Problem: मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार गावात पोहोचले. स्थानिक लोकांकडे दाटीवाटीने वास्तव्य करून राहू लागले आणि येथूनच पिण्याच्या पाण्याची उग्र समस्या सुरू झाली.
Water Crisis In Goa
No WaterCanva
Published on
Updated on

कळंगुट: ‘नेमेचि येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे उन्हाळा सुरू झाला की शिवोली मतदारसंघातील हणजूण, कायसूव, शापोरा आणि दांडा-गुडे परिसरातील लोकांची विशेष करून महिलांची पाण्यासाठी वणवण ही आता नित्याची बाब झाली आहे. मार्च-एप्रिल आणि मे महिना म्हणजे या भागातील लोकांसाठी ‘डोक्यावर उन्हाच्या झळा आणि पाण्यासाठी पळा’ अशी म्हणच सध्या या भागात रुजू झाली आहे.

आतापर्यंत कितीतरी आमदार, मंत्री झाले, गावांत ऐटीत फिरले, परिसराची पाहणी केली, मोठमोठी आश्‍‍वासने दिली, नवीन जलवाहिनी बसविलीपरंतु कसचे काय?

नशिबाचे भोग कसेच सरेनात. समोर महाकाय अरबी समुद्र आणि शापोरा नदीचा विहंगम संगम परंतु काठावर वसलेल्या जनतेचा पिण्याच्या पाण्यासाठी चाललेला आक्रोश अद्याप ना या भागातील (राजकीय) नेत्यांना ऐकू आला ना निसर्गाच्या संगमाला.

हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रातील लोकांनी आतापर्यंत अनेक आंदोलने पाण्यासाठी केली, मार्चे काढले, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कित्‍येक वेळा उंबरठे झिजवले पण काहीच उपयोग झाला नाही.

एकेकाळी अवघीच लोकसंख्‍या असलेल्या हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रातील अनेक प्रभागांतील लोकांना पुरेल इतका पाण्याचा पुरवठा म्हापशातील सार्वजनिक पाणीपुरवठा खात्याकडून व्हायचा. स्थानिक लोक त्या पाण्यावर समाधानी असायचे. परंतु कालांतराने पंचायत क्षेत्रात पर्यटनाच्या नावाखाली अंदाधुंद बांधकामे, गेस्ट हाऊसेस, हॉटेल-रिसॉर्ट्स, पंचतारांकित हॅटेल्स आदींनी येथील परिसर व्यापून टाकला.

Water Crisis In Goa
Goa Water Crisis: जलसंपदा खाते म्हणते पाणी आहे! मग 'ठणठणाट' का? कोणत्या भागांमध्ये भेडसावते आहे समस्या? जाणून घ्या

मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार गावात पोहोचले. स्थानिक लोकांकडे दाटीवाटीने वास्तव्य करून राहू लागले आणि येथूनच पिण्याच्या पाण्याची उग्र समस्या सुरू झाली. पर्यटनाच्या नावाखाली सुरू करण्यात आलेला गावाचा विकास साधताना मुलभूत गरजांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने सध्या हाच विकास आता भकास वाटू लागला आहे.

आता या गोष्टीला केवळ सरकारच जबाबदार नाही तर स्थानिकही तितकेच जबाबदार आहेत, असे या भागातील जाणकार लोकांचे म्हणणे आहे. हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रात सध्या स्थानिक लोकांपेक्षा हॉटेल्स-रिसॉर्टस्‌ आणि त्यात काम करणाऱ्या परप्रांतीय कामगार लोकांची वस्ती अधिक आहे.

Water Crisis In Goa
Water Shortage: मंत्र्यांच्या मतदारसंघातच पाणी नसेल तर राज्याला कसे मिळेल? कॅप्टन विरियातोंची सरकारवर घणाघाती टीका

हॉटेलवाल्यांची खासगी टॅकरवाल्यांशी मिलिभगत असल्याने त्यांना पाणीटंचाईचा प्रश्‍‍न सतावत नाही. वाट्टेल तेवढे पैसे मोजून ते आपली गरज भागवतात, परंतु पाण्यासाठी वणवण होते ती येथील सामान्य माणसाची.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com