Anjuna: वाढते ध्वनिप्रदूषण, सांडपाणी, पर्यावरणाचा होतोय नाश; हणजूण ग्रामसभेत ग्रामस्थ संतप्त, बेकायदेशीर रस्त्यांबाबतही चर्चा

Anjuna Gramsabha: पर्यावरणाचा पंचक्रोशीत होत असलेला नाश, ध्वनिप्रदूषण तसेच सार्वजनिक गटारातून सोडण्यात येणारे सांडपाणी असे प्रश्न उपस्थित करीत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.
Sound pollution
Noise PollutionCanva
Published on
Updated on

कळंगु: हणजूण - कायसूव पंचायतीची ग्रामसभा आज अनेक प्रश्नांवरून गाजली. जैवसंवर्धन तसेच पर्यावरणाचा पंचक्रोशीत होत असलेला नाश, ध्वनिप्रदूषण तसेच सार्वजनिक गटारातून सोडण्यात येणारे सांडपाणी असे प्रश्न उपस्थित करीत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.

सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर यांनी ग्रामस्थांना आपल्या परीने यथायोग्य उतरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु सभेत उपस्थित ग्रामस्थांनी सांडपाणी तसेच रात्री अपरात्री परिसरातील नाईट क्लब तसेच बार, रेस्टॉरंटकडून होत असलेल्या ध्वनिप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली.

Sound pollution
Anjuna: हणजुणातील 8 आस्थापने बंद! प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश; पब्ससह 24 ठिकाणी तपासणी

यावेळी उपसरपंच ज्योत्स्ना खोर्जुवेकर, पंच सुरेंद्र गोवेकर, दिनेश पाटील, श्रीमती मेंडोंसा, शितल नाईक, प्रतिमा गोवेकर, निकिता गोवेकर आदी उपस्थित होते. हणजूण - कायसूव पंचायतीचे सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर यांनी ग्रामसभेत गावचे प्रश्न तसेच समस्या मांडण्याचा ग्रामस्थांना पुरेपूर अधिकार असल्याचे सांगत पंचायत मंडळाकडून कुणाच्याच प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न होणार नसल्याचे सांगितले. ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न स्थानिक पोलिस यंत्रणांच्या मदतीने निश्चितच सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Sound pollution
Anjuna Noise Pollution: हणजूण ध्वनी प्रदूषण समितीच्या नावावरून घोळ; खंडपीठानं दिला एकमतानं निवडीचा निर्देश

किनारी भागात बेकायदेशीर रस्ते!

हणजूण, वागातोर किनारी भागात अज्ञातांकडून कच्चे रस्ते बनवण्याचे काम सुरू असून जैवसंवर्धन तसेच पर्यावरणाचा नाश होत असल्याने पंचायत मंडळाने पुढाकार घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जैवसंवर्धन कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com