Anjuna Noise Pollution: हणजूण ध्वनी प्रदूषण समितीच्या नावावरून घोळ; खंडपीठानं दिला एकमतानं निवडीचा निर्देश

Goa High Court: हणजूण परिसरातील ध्वनी प्रदूषण देखरेख समितीसाठी पाच सदस्यांपैकी दोन खासगी व्यक्तींची नावं सुचवण्यावरून सरकार व याचिकादारातर्फे ॲमिकस क्युरी यांच्यातील घोळ सुरूच आहे.
Anjuna Noise Pollution
Anjuna Noise PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हणजूण परिसरातील ध्वनी प्रदूषण देखरेख समितीसाठी पाच सदस्यांपैकी दोन खासगी व्यक्तींची नावे सुचवण्यावरून सरकार व याचिकादारातर्फे ॲमिकस क्युरी यांच्यातील घोळ सुरूच आहे.

दोघांच्या बाजूने काल सुचवण्यात आलेल्या नावांना हरकती घेण्यात आल्या. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नवी तटस्थ नावांची यादी द्या, असे निर्देश देत पुढील सुनावणी येत्या बुधवारी (५ मार्च) ठेवली आहे.

किनारपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात कर्कश आवाजात मर्यादाची वेळ उलटल्यानंतर रेस्टॉरंट्स व पब्समध्ये संगीत वाजवण्यात येत असल्याची अवमान याचिका गोवा खंडपीठासमोर आहे.

या याचिकेत खंडपीठाने पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यावर पोलिस, पंचायत व उपजिल्हाधिकारी कार्यालयात सदस्यांव्यतिरिक्त दोन खासगी व्यक्तींची वर्णी लावण्यासाठी सरकार व ॲमिकस क्युरींकडे नावे मागवली होती.

सरकारतर्फे दुमिंग परेरा व गोविंद धारगळकर यांची नावे देण्यात आली तर अवमान याचिकादाराच्या वकिलांतर्फे क्रूसेडर्स जेनी क्रॅस्टो नाव देण्यात खंडपीठासमोर सादर करण्यात आले.

Anjuna Noise Pollution
Goa RERA: गोवा 'रेरा'चा दणका! रजिस्ट्रेशन न केल्यामुळे पणजीतील बिल्डरला 5 लाखांचा दंड

मात्र दोघांनीही सादर केलेल्या नावांना यावेळी दोन्ही पक्षातर्फे हरकत घेण्यात आली. खंडपीठासमोर सादर करण्यात आलेल्या नावांच्या व्यक्तींचे पर्यटन व्यावसायिक लॉबी किंवा त्याविरुद्ध वावरत असलेल्या संघटनांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला.

Anjuna Noise Pollution
Goa Crime: 'अधिकारी आहे', गोव्यात सरकारी रेस्ट हाऊसमध्ये फुकटात घेतला पाहुणचार, दोन पुणेकरांना अटक

एकमत होणारे नाव द्या!

गेल्या काही दिवसांपासून सुनावणीवेळी दोघांकडून देण्यात आलेल्या नावांवर एकमत होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. अवमान याचिकादार डेस्मंड आल्वारिस यांनीही आपली यादी दिली ती सरकार व ॲमिकस क्युरीने फेटाळली.

त्यामुळे खंडपीठाने सरकार व ॲमिकस क्युरीतर्फे एकमत होणारे नाव पुढील सुनावणीवेळी द्या, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com