anjuna beach car viral video
anjuna beach car viral videoDainik Gomantak

नवी कोरी गाडी घातली समुद्रात! सुरक्षारक्षकाच्या सूचनांकडे दुर्लक्ष, हणजूण किनाऱ्यावर पर्यटकाची फजिती; Watch Video

anjuna beach car viral video: हणजूण समुद्रकिनाऱ्यावर एका पर्यटकाने आपली अवघ्या २० दिवसांपूर्वी खरेदी केलेली 'किया कॅरेन्स' गाडी थेट समुद्रात उतरवण्याचा प्रयत्न केला
Published on

car stuck in sea goa: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी केलेल्या बेजबाबदार कृत्याची आणखी एक घटना समोर आली आहे. हणजूण समुद्रकिनाऱ्यावर एका पर्यटकाने आपली अवघ्या २० दिवसांपूर्वी खरेदी केलेली 'किया कॅरेन्स' (Kia Carens) गाडी थेट समुद्रात उतरवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकाने वारंवार रोखूनही त्याने दुर्लक्ष केले, ज्यामुळे त्याची गाडी वाळूत अडकून अंशतः पाण्यात बुडाली.

सकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेचे दृष्य भयावह होते. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एका पर्यटकाने आपली गाडी घेऊन हणजूण समुद्रकिनाऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्याला असे न करण्याबद्दल वारंवार सूचना दिली आणि गाडी मागे घेण्यास सांगितले. मात्र, पर्यटकाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तो पुढे जात राहिला. काही क्षणातच त्याची गाडी ओल्या वाळूत अडकली.

anjuna beach car viral video
Viral Video: प्रेषित मुहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; कारवाई करण्याची मागणी

गाडी वाळूतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असतानाच समुद्राला भरती आली. वाळूत अडकलेली गाडी भरतीच्या लाटांनी वेढली गेली आणि काही वेळातच ती अंशतः पाण्यात बुडाली. पर्यटकाने दिलेल्या माहितीनुसार त्याची गाडी चुकून समुद्राच्या पाण्यात गेली, पण सुरक्षा रक्षकाच्या म्हणण्यानुसार त्याने जाणीवपूर्वक हा प्रकार केला.

ही घटना घडत असताना आजूबाजूला असलेले स्थानिक लोक आणि इतर पर्यटक केवळ पाहत राहिले. अखेर या घटनेची माहिती हणजूण पोलिसांना देण्यात आली. स्थानिक आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी अखेर गाडी पाण्याबाहेर काढण्यात आली. ही गाडी बराच काळ पाण्यात अडकल्यामुळे ठीक होईल अशी चिन्हे दिसत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com