Babush Monserrat: बाबूश मोन्सेरात यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्रक्रिया; मंत्री, आमदारांची गोमेकॉत धाव

Babush Monserrat: प्रकृती स्थिर: मंत्री, आमदारांची गोमेकॉत धाव
Babush Monserrat
Babush MonserratDainik Gomantak
Published on
Updated on

Babush Monserrat: महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार आतानासियो (बाबूश) मोन्सेरात यांच्यावर रविवारी मध्यरात्री अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तत्काळ गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. शस्रक्रिया झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांना हलविण्यात आले आहे.

Babush Monserrat
Ayodhya Ram Mandir: रामनामाच्‍या जयघोषात गोमंतकात दीपोत्‍सव

मंत्री बाबूश यांच्यावर शस्रक्रिया झाल्याचे वृत्त सकाळी ‘गोमन्तक टीव्ही’वर सर्वात प्रथम देण्यात आले. आमदार मोन्सेरात यांच्यावर शस्रक्रिया झाल्याचे वृत्त समजताच त्यांचे कार्यकर्ते, नगरसेवकांनी गोमेकॉकडे धाव घेतली.

कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, आमदार विजय सरदेसाई, माजी आमदार टोनी फर्नांडिस, आग्नेलो फर्नांडिस यांनी उपस्थिती लावली. सायंकाळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गोमेकॉत जाऊन मंत्री बाबूश यांची भेट घेतली.

मिरामार येथे रविवारी खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह वाळू शिल्प पाहण्यासाठी ते गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी शिल्प रांगोळीने रंगविले आणि काही वेळाने घरी परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तत्काळ गोमेकॉमध्ये हलविण्यात आले.

रात्री शस्रक्रिया झाल्यानंतर त्यांची काळजी घेण्यासाठी रात्रभर त्यांच्या पत्नी तथा आमदार जेनिफर मोन्सेरात, पुत्र तथा महापौर रोहित मोन्सेरात, त्यांच्या स्वीयसाह्यक निदा हे गोमेकॉमध्ये उपस्थित होते. सकाळी गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनीही मंत्री मोन्सेरात यांची विचारपूस केली आणि वैद्यकीय अहवालही पाहिला.

दोन दिवस इस्पितळातच

मंत्री मोन्सेरात यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्यांना काही काळ विश्रांतीची गरज आहे. दोन दिवस ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी इस्पितळात डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतील, अशी माहिती गोमेकॉचे अधिष्ठाता शिवानंद बांदेकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com