Ayodhya Ram Mandir: रामनामाच्‍या जयघोषात गोमंतकात दीपोत्‍सव

Ayodhya Ram Mandir: आनंद सोहळा : लक्ष लक्ष दिव्‍यांनी उजळले आसमंत
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirDainik Gomantak
Published on
Updated on

Ayodhya Ram Mandir: अयोध्‍यानगरीत आज अभिजीत मुहूर्तावर प्रभू श्रीरामांच्‍या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्‍ठापना झाली आणि चराचरांत रामनामाची स्‍पंदने उमटली. गोव्‍यात घराघरांवर डौलात भगवे ध्वज फडकले; दारासमोर रांगोळ्या साकारल्‍या; मंदिरांमधून भजन, आरत्‍यांचे स्‍वर निनादले; ‘जय श्रीराम’च्या जयघोषात सारे राज्य भक्‍तिरसात न्हाऊन निघाले.

Ayodhya Ram Mandir
Famous Church: जाणून घ्या, पोर्तुगीज वास्तुकलेचा अनोखा नजारा असलेले गोव्यातील 'चर्च'

सायंकाळी ठिकठिकाणी पारंपरिक वेशभूषेसह निघालेल्‍या मिरवणुका व तदनंतर पणत्‍या, नेत्रदीपक विद्युत रोशणाईने अवघा आसमंत उजळून निघाला. गोमंतकीयांनी ऐन पौषात दीपावली साजरी केली व मांगल्याची अनुभूती घेतली.

अयोध्‍येत श्रीराम मूर्ती प्रतिष्‍ठापना झाली आणि गोमंतकातील लाखो भाविकांचे स्‍वप्‍न अखेर पुरे झाले. पंतप्रधानांनी केलेल्‍या आवाहनानुसार, राज्यातील प्रत्येक घरात, गावातील मंदिरांमध्ये मोठ्या भक्‍तिभावाने श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव साजरा करण्‍यात आला. सकाळपासून मंदिरांमध्ये, अभिषेक, पूजा, भजन, आरती, महाप्रसाद तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सायंकाळी दीपोत्‍सव साजरे झाले. मांगल्‍याने भारलेल्‍या वातावरणामुळे गोमन्तभूमी राम रंगी रंगली.

काणकोणपासून पेडणेपर्यंत आज धार्मिक कार्यक्रम झाले. राजधानी पणजीतील श्री वाठारेश्‍वर मंदिर, ग्रामदैवत श्री महालक्ष्मी संस्थान, शंकरवाडीतील शंकर देवस्थान, भाटलेतील श्रीराम मंदिर, मारुतीगड आदी देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

श्री महालक्ष्मी मंदिरात श्री रामचंद्र, माता सीता, लक्ष्मण आणि श्री हनुमानाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. अयोध्येत संपन्न होणारा श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी खास स्क्रिनिंग करण्यात आले होते. हजारो भाविकांनी आज मंदिरांमध्ये देवदर्शन घेतले. सामूहिक आरती करण्यात आली. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com