Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Anant Chaturdashi 2025 wishes: 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देत आहेत.
anant chaturdashi message from cm
anant chaturdashi message from cmDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीच्या पवित्र दिवशी गोव्यासह महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरात गणेशाच्या मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देत आहेत. संपूर्ण वातावरणात एकीकडे आनंदाची लहर आणि दुसरीकडे बाप्पाला निरोप देण्याची भावना दिसून येत आहे.

मुख्यमंत्री सावंतांनी दिल्या गणेशभक्तांना शुभेच्छा

गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सर्व गोमंतकीय आणि गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, "हा दिवस केवळ निरोपाचा नसून, तो एका नवीन सुरुवातीचे, दृढ श्रद्धेचे आणि भविष्यातील आशेचे प्रतीक आहे." मुख्यमंत्र्यांनी गणेशाच्या चरणी सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि भरभराट कायम राहो अशी प्रार्थना केली.

दीड दिवसांपासून ते एकवीस दिवसांपर्यंत चाललेला गणेशोत्सव

गणेश चतुर्थी हा गोव्यामध्ये एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय सण आहे. या उत्सवामध्ये गणेशभक्त दीड, पाच, सात, नऊ, अकरा किंवा अगदी एकवीस दिवसांपर्यंत गणेशाची मनोभावे पूजा करतात. या काळात संपूर्ण राज्यात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते.

anant chaturdashi message from cm
Goa Ganesh Chaturthi: शेकडो वर्षांपासून चालत आलेली गोव्यातील 'रक्तवर्ण' गणपतींची परंपरा

आज अनंत चतुर्दशीला या भव्य उत्सवाची सांगता होत आहे. ठिकठिकाणी मिरवणुका काढून बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा याच उत्साहात बाप्पाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त आतुरतेने वाट पाहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa maritime development project
CM Pramod Sawant RGP Crisis Statement
Goa Monsoon Preparedness
CM Pramod Sawant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com