Anand Mahindra Viral Tweet: आनंद महिंद्रांची बकेट लिस्ट समोर; म्हणाले मुंबई ते गोवा 6 तासांत प्रवास करायचाय, पण...

Mahindra Thar ROXX: सोशल मीडियावर पोस्ट करत ते म्हणालेत की त्यांना मुंबई ते गोव्याचा प्रवास केवळ ६ तासांत महिंद्रा थार रॉक्सने करायचा आहे
Mumbai To Goa
Mumbai To GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai- Goa Road Trip: महिंद्रा ग्रुप्सचे चेअरमेन यांनी गोव्याच्या संदर्भात एक खास इच्छा व्यक्त केलीये. सोशल मीडियावर पोस्ट करत ते म्हणालेत की त्यांना मुंबई ते गोव्याचा प्रवास केवळ ६ तासांत महिंद्रा थार रॉक्सने करायचा आहे. याबद्दल बोलताना त्यांनी जुन्या हिंदी सिनेमाचा दाखला दिला.

आनंद महिंद्रा म्हणतायत की त्यांना फक्त ६ तासांत मुंबईहून गोव्याला यायचं आहे आणि त्यांना हा प्रवास महिंद्रा थार रॉक्सने करायचा आहे. आनंद महिंद्रा या गोवा प्रवासाला अनेक वर्षांपूर्वी आलेल्या बॉम्बे टू गोवा सिनेमाचा रिमेक म्हणतायत मात्र तिथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे हा प्रवास खास म्हणावा तास अडव्हेंचर्स असेल का असा त्यांना प्रश्न पडलाय.

बॉम्बे टू गोवा सिनेमा

अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, अरुण इराणी अशा बड्या कलाकारांसह काही वर्षांपूर्वी बॉम्बे टू गोवा असा चित्रपट प्रदर्शित झाला होता. एस. रामनाथन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. नेटकरी देखील आनंद महिंद्रा यांच्या सोशल मीडिया पोस्टवर भरपूर प्रतिसाद देत आहेत.

Mumbai To Goa
​Thar, Scorpio आणि XUV700 महागल्या, जाणून घ्या काय आहेत नवीन किमती

नेटकऱ्यांना महिंद्रा थार गाडीमधून गोव्याचा हा प्रवास खूपच आकर्षक वाटतोय, ते म्हणतायत की मुंबई गोव्याचे अंतर आणि थार रॉक्सचा प्रवास हा नक्कीच एका क्लासिक प्रवासाचे उदाहरण आहे. नेटकरी म्हणतायत की थार नेहमीच कम्फर्टेबल प्रवासाची सोय करून देते आणि त्यात गोव्याला जाणारा हा प्रवास म्हणजे उत्कृष्ट असणार यात शंका नाही.

महिंद्रा थार रॉक्स

महिंद्रा थार रॉक्स हे मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेलं ५ सीटर, ४ सिलेंडर असलेलं वाहन आहे, ज्याची किंमत १२.९९ लाख आणि २३.०९ लाख रुपयांच्या आसपास आहे ऑफ रोडींगच्या चाहत्यांसाठी थार नेहमीच आकर्षण ठरली आहे. महिंद्रा थार रॉक्स ही १२.४ ते १५.२ किलोमीटरची मायलेज देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com