कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कसून प्रचार करत आहे. गोव्यातील मंत्री आणि बड्या नेत्यांची फौज सध्या कर्नाटकमध्ये प्रचारात गुंतली आहे. दरम्यान, गोव्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्वाची असलेल्या कदंबच्या बसेस कर्नाटकमध्ये प्रचारासाठी जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आला असून, यात कदंबच्या तब्बल 140 हून अधिक बस कर्नाटकला जात असल्याचा आरोप या व्हिडिओतून करण्यात आला आहे.
काय आहे व्हिडिओ?
कर्नाटकमध्ये अंकोला येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी तेथील लोकांना आणण्यासाठी या बस गोव्यातून कर्नाकला जात असल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. जवळपास 144 कदंब बस कर्नाटकला जात असल्याने राज्यातील सामान्य प्रवाशांची गैरसोय होणार असल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे.
कर्नाटकला निघालेल्या या बसेस रस्त्याकडेला पार्क केल्या असताना हा व्हिडिओ करण्यात आला असून, बसेसवरती K50, K70 असे क्रमांक देण्यात आले आहेत. रस्त्याकडेला उभ्या करण्यात आलेल्या बसेसची मोठी रांग दिस आहे.
मोठ्या प्रमाणावर कदंब बस कर्नाटकमध्ये जाणार असल्याने गोव्यातील समान्य प्रवाशांना हाल सहन करावे लागणार असल्याचे व्हिडिओतून म्हटले आहे.
दरम्यान, मोठ्या प्रमाणावर कर्नाटकला चालेल्या बसेस भाडे तत्वावर घेतल्या आहेत का? याबाबत माहिती मिळू शकली नाही. तरीही मोठ्या संख्येने बसेस कर्नाटकमध्ये जात असल्याने प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोईबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.