Siolim: शिवपुतळ्यासाठी गुरुवारी शिवोलीत पायाभरणी

Siolim: थिएटर जंक्शन भागात उभारणार पुतळा
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024Dainik Gomantak

Siolim:

शिरोली येथील जुना थिएटर जंक्शन परिसरात समर्थन संघटना शिवोलीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याची लवकरच उभारणी करण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. २८) दुपारी या पुतळ्यासाठी चौथरा उभारण्याच्या कामाची पायाभरणी होणार आहे,

असे स्वामी समर्थ मठाचे संस्थापक नीलेश वेर्णेकर तसेच संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद आरोलकर यांनी सांगितले. शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांच्या पुढाकाराने या भागातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू असून रुंदीकरण पूर्ण होताच पंचवीस फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024
Dolphin In Goa: गोव्यात आढळणाऱ्या डॉल्फिनच्या दोन प्रजाती धोक्यात !

तसेच जुना थिएटर जंक्शनचे नामकरण शिवाजी महाराज चौक असे करावे,असे वेर्णेकर यांनी सांगितले.

शिवोली-चोपडे पुलावर प्रभात फेरी

दरम्यान, 7 एप्रिलला गुडी पाडव्याच्या निमित्ताने शिवोली-चोपडे पुलावर विशेष प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वसंत विद्यालयाचे हेडमास्तर सूरज चोडणकर यांनी यावेळी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com