Dolphin In Goa: गोव्यात आढळणाऱ्या डॉल्फिनच्या दोन प्रजाती धोक्यात !

Dolphin In Goa: ‘टेरा कॉन्शस’च्या संस्थापक पूजा मित्रा: वन्यजीव प्रशिक्षणाच्या अभावाचा परिणाम
Dolphin In Goa:
Dolphin In Goa:Dainik Gomantak
Published on
Updated on

Dolphin In Goa:

धीरज हरमलकर

गोव्याच्या किनारपट्टीवर आढळणाऱ्या हंपबॅक डॉल्फिन आणि फिनलेस पोर्पोइस या डॉल्फिनच्या दोन प्रजातींचे अस्तित्व सध्या धोक्यात आहे,असे ‘टेरा कॉन्सस’ संस्थेच्या संस्थापक पूजा मित्रा यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

गोव्यात सागरी सस्तन प्राण्यांच्या दोन निवासी प्रजाती आहेत - इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिन (सौसा प्लम्बिया) आणि फिनलेस पोर्पोइस. दोन्ही प्रजातींना भारताच्या वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या अनुसूची अंतर्गत सूचिबद्ध केले आहे, त्यामुळे त्यांनाही वाघासारखेच संरक्षण दिले गेले आहे.

गोवा वन विभाग हे सागरी प्रजातींसह राज्यातील सर्व वन्यजीवांचे संरक्षक आहेत. वन्यजीव प्रशिक्षणाचा अभाव, अमर्याद मासेमारी, बेजबाबदार पर्यटन या सर्व बाबी डॉल्फिनच्या मुळावर येत आहेत,असेही मित्रा म्हणाल्या. हवामान बदलाचा डॉल्फिनवरही परिणाम होतो,असेही मित्रा यांनी सांगितले.

Dolphin In Goa:
Tamnar Project: दक्षिण गोव्‍याला ‘तम्नार’कडून वीज न मिळाल्‍यास उत्तरेतून देणार

प्रशिक्षणाचा अभाव 

दुर्दैवाने गोव्यात आम्ही अद्याप सागरी पर्यटन उद्योगात आवश्यक शाश्वत प्रशिक्षण दिलेले नाही. बोट आणि जलक्रीडा परवाना संबंधित प्रशासनाकडून विनाचौकशी जारी केला जातो. परंतु सागरी परिसंस्था आणि वन्यजीव यांविषयी कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही.

बेजबाबदार पर्यटन

गोव्यात डॉल्फिन पाहण्याच्या जाहिराती तुम्हाला नेहमीच दिसतील. ज्यात, डॉल्फिन उड्या मारतात. पर्यटक अशा दृश्यांची मागणी करतात. ज्यामुळे चालकांना डॉल्फिनच्या अगदी जवळ जाणे भाग पडते. बोटी समुद्रात सतत डॉल्फिनचा पाठलाग करत असतात, ज्यामुळे डॉल्फिनच्या वर्तनावर नकारात्मक परिणाम होतो.

Dolphin In Goa:
Mapusa River: म्हापसा नदीतील तब्बल 386 किलो कचरा हटवला

हंपबॅक डॉल्फिन 280 किलोच्या असू शकतात!

सौसा प्लम्बिया आणि फिनलेस पोर्पोइस या दोन प्रजातींना तटीय सागरी सस्तन प्राणी मानले जाते. किनाऱ्यालगत पाण्याजवळ अंदाजे 50 फूट खोलीपर्यंत वास करतात. हंपबॅक डॉल्फिन अधिक सहजपणे दिसतात.

ते प्रौढ म्हणून 11 फूट लांबीपर्यंत वाढू शकतात आणि सुमारे 280 किलो वजनाचे असू शकतात, त्यांच्या पाठीवर पृष्ठीय पंखाच्या आधी एक विशिष्ट कुबड असते आणि म्हणूनच त्यांना हंपबॅक डॉल्फिन म्हणतात.

हंपबॅक डॉल्फिन राहते ‘पॉडस्’ गटात

ही प्रजाती अत्यंत सामाजिक आहे आणि ''पॉड्स'' नावाच्या सामाजिक, मातृसत्ताक गटात राहते. ते त्यांच्या पिलांना दूध पाजतात आणि मासे कसे पकडायचे ते शिकवतात. मानवाप्रमाणेच, दोन्ही सस्तन प्राण्यांप्रमाणे त्यांचे दात असतात. त्यांच्या शिकारीत विविध प्रकारचे मासे (शेवटो, बांगडा, तारली, पापलेट, इसवण इ.) आणि कधीकधी क्रस्टेशियन्स देखील असतात.

ट्रॉल नेट, पर्ससीन, स्टॅक नेट इत्यादींद्वारे मच्छिमार मासेमारी करत आहेत. हे या डॉल्फिनसाठी धोकादायक आहे. हे मासे फाटलेल्या जाळ्यांचे तुकडे खाऊ शकतात ज्यामुळे आतड्यांवर परिणाम होऊन मृत्यू होऊ शकतो,असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com