शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी व पालक वर्गात उत्साहाचे वातावरण

चिमुकल्यांना शाळेत सोडण्यासाठी मोठया संख्येने पालकांनी गर्दी केली होती.
Goa Schools
Goa Schools Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: आजपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेचा आजचा पहिला दिवस विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी गजबजून गेला आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर पालक वर्गात चिंतेचे वातावरण दिसुन येत होते. राज्यातील शाळांसोबतच शिशुविकास वर्ग पूर्व प्राथमिक शाळा देखील सुरू झाल्या आहेत. चिमुकल्यांना शाळेत सोडण्यासाठी मोठया संख्येने पालकांनी गर्दी केली होती.

(An atmosphere of excitement in the class of students and parents on the first day of school)

Goa Schools
मॉन्सूनची कारवारपर्यंत आगेकूच; दोन दिवस राज्यात पाऊसच नाही

कोविड महामारीनंतर शाळांवर विविध प्रकारचे निर्बंध आले होते. आता दोन वर्षानंतर प्रथमच पूर्ण क्षमतेने शाळांमध्ये किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. सोमवारपासून 2022 -23 या शैक्षणिक वर्षाला नियमितपणे सुरवात होत असली तरी कोविडचे संकट घोंघावत आहे. बाधितांची संख्या वाढत असल्याने पालकांच्या मनात भीती कायम आहे. पण गोवा सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे सक्तीने पालन करण्याची तयारी शाळा व्यवस्थापनांनी केली आहे.

- डॉ.प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

नियमावलीचे सक्तीने पालन केले जाईल. संपूर्ण शाळा संकुल सॅनिटायझर केले आहे. शिक्षकांना अगोदर निर्देश देण्यात आले आहे. शाळेत मास्क परिधान केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. मास्क नसल्यास ते देण्यात येईल. सोमवारी शाळा सकाळी १०.३० वा. सुटणार आहे. विद्यार्थी मिसळू नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. - अपर्णा चारी, मुख्याध्यापिका, मुष्टीफंड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com