Ponda News : कलाकाराकडे जिद्द, निग्रह हवा : नारायण नावती

Ponda News : रासई येथील श्री लक्ष्मी मंदिर पूजा समितीने आयोजित केलेल्या स्वर लक्ष्मी या सांगीतिक कार्यक्रमाच्या ३५ व्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नावती बोलत होते.
Ponda News :
Ponda News : Dainik Gomantak
Published on
Updated on

Ponda News : फोंडा, अनेक नवनवीन संकल्प अंगीकारून कला क्षेत्रात उतरलेला साधक हा सातत्याने यशाच्या मार्गावरूनच पदक्रमण करीत असतो. संगीताच्या माध्यमातून संस्कृतीची नाळ धरून चालणारा कार्यकर्ता हेच संस्कृती संवर्धनाचे सूत्र आहे.

म्हणूनच कलाकाराकडे जिद्द आणि निग्रह असावा लागतो. श्रमजीवी आणि मेहनती कलाकाराला आपल्या उज्ज्वल भविष्याची चाहूल लागलेली असते म्हणूनच त्याची सकारात्मक धडपड कदापि व्यर्थ ठरत नाही, असे प्रतिपादन निवृत्त निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी केले.

रासई येथील श्री लक्ष्मी मंदिर पूजा समितीने आयोजित केलेल्या स्वर लक्ष्मी या सांगीतिक कार्यक्रमाच्या ३५ व्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नावती बोलत होते.

मंदिराच्या प्राकारात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला प्रमुख वक्ते प्रा. रूपेश गावस, दत्ताराम वस्त, देवस्थानचे अध्यक्ष गीतेश रासईकर, सचिव जीवानंद गावडे, सत्कारमूर्ती उल्हास देऊ नाईक, मंगलदास धनंजय नाईक, प्रशांत नामदेव नाईक तसेच आयोजन समितीचे गोकुळदास रासईकर उपस्थित होते.

Ponda News :
Goa Cricket: कूचबिहार ट्रॉफी स्पर्धेत पुंडलिक नाईक करणार गोवा संघाचे नेतृत्व

यावेळी भजन क्षेत्रात योगदान दिलेले भजनी कलाकार उल्हास नाईक, मंगलदास नाईक तसेच समाजसेवी कार्यासाठी प्रशांत नाईक यांचा सत्कार करण्यात आला. नावती यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.

नामांकित तबलापटू स्वर्गीय मयुरेश वस्त यांच्या स्मरणार्थ पाचवा पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध तबलावादक व संगीत शिक्षक रोहित बांदोडकर यांना वितरित करण्यात आला. यावेळी ३५ व्या स्वर लक्ष्मी कार्यक्रमात नामांकित गोमंतकीय कलाकार रूपेश गावस, शैलेश गावकर, नीलेश शिंदे, रोहित खांडोळकर,

विनोद नाईक, श्रीकांत शिरोडकर, विष्णू नाईक, श्रेया मनोज नाईक, चैतन्य शिंदे, रियांश शिरोडकर, बिंदिया नाईक, प्रथमेश च्यारी, धनराज मडकईकर, गोकुळदास रासईकर, प्रभाकर नाईक आदी कलाकारांनी भाग घेऊन आपली कला सादर केली. उमेश रासईकर यांनी स्वागत केले. दुर्गाकुमार नावती यांनी सूत्रसंचालन केले. गोकुळदास रासइकर यांनी आभार मानले.

Ponda News :
Ganesha Temple: चोहोबाजूंनी कुळागारांनी वेढलेला तळ्यातला गणेश

मयुरेश वस्त कुशल संगीतकार : गावस

प्रमुख वक्ते प्रा. रूपेश गावस म्हणाले की, मयुरेश वस्त यांचे अकाली निधन झाले. सर्वार्थाने संगीताचे व्रत घेतलेले मयुरेश नेहमीच नाविन्याच्या शोधात असायचे.

ते कुशल संगीतकार होते. संगीत क्षेत्रातील कठीण आव्हाने स्वीकारण्यात ते माहीर होते. आपणही त्यांच्या सहवासात खूप काही शिकलो. सांगीतिक ज्ञानही त्यांच्याकडून घेतले, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com