Amrit Bharat Station Scheme: गोव्‍यातील 3, देशातील 1309 रेल्वे स्थानकांना देणार नवा साज : पंतप्रधान मोदी

देशातील सर्व राज्यांना याचा फायदा होईल : पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak

3 Railway Stations In GoaTo Be Redeveloped Under Amrit Bharat Station scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमृत भारत स्टेशन योजनेचा आभासी पद्धतीने शुभारंभ केला. त्‍या अंतर्गत देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 508 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. त्‍यात गोव्‍यातील तीन स्‍थानके आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील सर्व राज्यांना याचा फायदा होईल. उत्तर प्रदेशमध्ये सुमारे 4500 कोटी रुपये खर्चून 55 अमृत स्टेशन विकसित केले जातील. राजस्थानच्या 55 रेल्वे स्थानकांचीही पुनर्बांधणी केली जाणार आहे.

PM Narendra Modi
पैसे न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; 'पर्ल्स अ‍ॅग्रोटेक'च्या गुंतवणूकदारांचा इशारा

उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक शोभन चौधरी म्हणाले, पुढील ३० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम करावे लागणार आहे. या योजनेंतर्गत रेल्वे स्थानके शहराचे केंद्र म्हणून विकसित केली जाणार आहेत.

यासाठी २४,४७० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मध्य प्रदेशातील राणी कमलापती, गुजरातमधील गांधीनगर आणि कर्नाटकातील सरम विश्वेश्वरय्या रेल्वे स्टेशनचे या योजनेंतर्गत आधीच नूतनीकरण करण्यात आले आहे.

PM Narendra Modi
Calangute News: ओढणीने गळफास घेत 18 वर्षीय युवतीची कळंगुटमध्ये आत्महत्या; कारण अस्पष्ट

उत्तर रेल्वेच्या 144 स्थानकांचा पुनर्विकास

या योजनेअंतर्गत उत्तर रेल्वेच्या १४४ स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. दिल्ली विभागातील एकूण ३३ स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे, त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी १४ स्थानकांची निवड करण्यात आली आहे.

नुतनिकरण होणारी राज्‍यनिहाय स्‍थानके

मध्य प्रदेश ८०, हरयाणा ४०, आंध्र प्रदेश ७२, अरुणाचल प्रदेश १, आसाम ५०, बिहार ९२, छत्तीसगड ३२, दिल्ली १३, गोवा ३, गुजरात ८७, हिमाचल प्रदेश ४, तर झारखंडच्या ५७ स्थानकांचाही समावेश करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com