Amit Patkar: असा आहे भाजपच्या 'हराम राज्या'च्या नेत्यांचा खरा चेहरा! 'त्या' कृत्यावरून अमित पाटकरांची खरमरीत टीका...

श्रीगणेशाचा अनादर केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना खडसावत त्यांच्या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे.
Amit Patkar Slams BJP Government
Amit Patkar Slams BJP GovernmentDainik Gomantak

Amit Patkar Slams BJP Government

श्रीगणेशाचा अनादर केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना खडसावत त्यांच्या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. श्रीगणेश मूर्तीजवळ पायात चपला घालून उभे असलेले भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या फोटोवर आक्षेप घेत काँग्रेस पक्षाने भाजपची 'अहंकारी भाजपच्या मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे लाजिरवाणे कृत्य', अशा कडक शब्दात निंदा केली आहे.

श्रीगणेशाचा अनादर करणाऱ्या या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. यांना कायमचा धडा शिकवण्याची वेळ आली आहे, अशी पोस्ट कॉंग्रेसने आपल्या समाज माध्यमांवर केली आहे.

जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या हराम राज्याच्या ध्वजवाहकांचा हा खरा चेहरा आहे. गणपती बाप्पाची पवित्र मूर्ती पायाशी ठेवून, पायात बूट घालून उभे असलेले नेते पाहून मला खूप वाईट वाटले. या लज्जास्पद कृत्याचा मी निषेध करतो, अशी जळजळीत प्रतिक्रीया काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

आरएसएस प्रशिक्षित भाजप मंत्री, आमदार आणि सदस्यांनी केलेल्या या लज्जास्पद कृत्याला माफी नाही. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. सुभाष वेलिंगकर विघ्नहर्ताच्या या अनादरावर बोलणार की तोंड बंद ठेवणार? शेफाली वैद्य आणि गिरीराज पै वेर्णेकर हे भाजपचे लाऊडस्पीकर कुठे आहेत? असा सवाल काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी दिव्या कुमार यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com