मडगाव: जुन्या गोव्यातील (Goa) सेंट कॅजेटन चर्चजवळील (St. Cajetan Church) वादग्रस्त बांधकामाबद्दल गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी शहर आणि नगर नियोजन मंत्री चंद्रकांत कवळेकर (Chandrakant Kavalekar) यांना पत्र लिहिले असून या बांधकामाला दिलेल्या परवानग्या रद्द करण्याची मागणी केली आहे.
या बांधकामाला दिलेल्या परवानग्या रद्द करण्यापासून तुम्हाला कोण अडवत आहे. त्यांनी परवानगी का दिली असा प्रश्न त्यांनी मंत्र्यांना केला आहे.
शहर आणि नगर नियोजन, तसेच पुरातत्त्व खात्याचे मंत्री म्हणून, तुम्हाला या प्रकारच्या घडामोडींचे आजूबाजूच्या वारसा असलेल्या इमारतींवर काय परिणाम होऊ शकतात याबद्दल माहिती नाही का?" असा प्रश्न सरदेसाई यांनी केला आहे.
राजकारणाच्या नावाखाली आंदोलन करणाऱ्या लोकांच्या काळजीचा आणि आवाजाचा गैरवापर करू नये असे सरदेसाई यांनी सांगितले आहे. "सरकारकडे उत्तर मागणाऱ्या प्रत्येक आवाजासोबत मी आहे." असे त्यांनी पुढे सांगितले.
“तुमच्या पूर्ण बिगर आघाडीच्या भाजप सरकारने जुन्या गोव्याच्या आसपासच्या वारसा वास्तूंचे नुकसान करण्याचा, नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पूर्वी तुमच्या सरकारने जुन्या गोव्यातील एला गावाचा (से कॅथेड्रल जवळ) ग्रेटर पणजी ओडीपी अंतर्गत समावेश करण्याची योजना आखली होती.’’ असे ते म्हणाले.
गोवा फॉरवर्ड पक्ष आणि आपण स्वता हा मुद्दा गोव्याचे राज्यपाल आणि जागतिक युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्रासमोर मांडला होता असे ते म्हणाले.
“या बेकायदेशीर रचनेच्या बाबतीत, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि दिवंगत फ्रान्सिस डिसोझा यांच्या नेतृत्वाखालील तुमच्या भाजप सरकारनेच ह्या परवानग्या दिल्या होत्या.’’ असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
जेव्हा या वादग्रस्त बांधकामाला परवानगी देण्यात आली तेव्हा ते भाजप सरकारचा भाग नव्हते, असेही सरदेसाई यांनी नमूद केले आहे.
"मी तुम्हाला गोव्यातील लोकांसमोर सत्यासह पुढे यावे अशी कळकळीची विनंती करतो आणि जर तुम्ही आणि तुमच्या सरकारने 2016 आणि 2021 मध्ये चुकीचे काम केले असेल तर 03 डिसेंबर 2021 पर्यंत माफी मागावी." असे सरदेसाई यांनी पत्रात म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.