
पणजी: आम आदमी पक्षाचे ॲड. अमित पालेकर यांनी वकील म्हणून चिंबलमधील सरकारी जमिनींवरील परप्रांतीयांची वस्ती हटविण्यास मदत करावी. तसे त्यांनी केले तर रेव्हुलेशनरी गोवन्स पक्ष, आपशी युती करण्यास तयार आहे, असे आरजीचे प्रमुख आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी म्हटले आहे.
परब यांनी चिंबल येथे शासकीय जमिनीवर बेकायदेशीरपणे राहणाऱ्या स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आणि पालेकर यांना आरजीपीसोबत मिळून ही बेकायदेशीर बांधकामे पाडण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
परब म्हणाले, चिंबलमध्ये अनेक स्थलांतरित शासकीय जमिनीवर बेकायदेशीरपणे राहतात. अमित पालेकर यांनी आमच्यासोबत यावे; आपण त्यांच्या बेकायदेशीर घरांची तोडफोड करूया. ते वकील आहेत, त्यामुळे त्यांची मदत उपयोगी ठरेल. आम्ही त्यांच्या मतदार ओळखपत्रांचाही रद्द करण्याचा प्रयत्न करू. जर त्यांनी हे केले, तर आम्ही त्यांच्यासोबत थेट युती करू, असे ते म्हणाले.
त्यांनी आरजी पक्षाचे मुख्य लक्ष २६-२७ मतदारसंघांवर असेल, जिथे गोमंतकीय मतदारांचा बहुमत आहे. हे मतदारसंघ पक्षाच्या विजयासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. परब यांनी अशा १३ मतदारसंघांविषयीही चिंता व्यक्त केली, जिथे गोमंतकीय मतदार अल्पसंख्य होत आहेत किंवा अल्पसंख्याक होण्याच्या मार्गावर आहेत. आम्हाला कुठे ऊर्जा केंद्रित करायची आहे, याची पूर्ण जाणीव आहे, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे. त्यांनी या भागांमध्ये गोमंतकीय मतदार प्रभाव कायम राखण्याच्या गरजेवर भर दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.