आगामी अधिवेशनात लोकांचे प्रश्‍न मांडणार : आम आदमी पार्टी नेते अमित पालेकर

17 जूनपर्यंत प्रश्‍न, समस्या पाठवण्याचे आवाहन
Amit Palekar
Amit PalekarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : आगामी 11 जुलै रोजी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात लोकांकडून प्रश्‍न आणि समस्या मागवल्‍या जात असून गोमंतकीयांनी आपले प्रश्‍न, समस्या किंवा अडचणी आम आदमी पक्षाच्‍या कार्यालयात आणून द्याव्यात किंवा पणजीतील महालक्ष्मी मंदिराजवळील पक्षाच्‍या कार्यालयात पोहोच कराव्‍यात, असे आवाहन आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी केले. येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्‍वा, बाणावलीचे आमदार वेन्‍झी विएगस उपस्‍थित होते.

Amit Palekar
युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी : विश्वजीत राणे

विधानसभा अधिवेशनात सर्वसामान्‍यांच्‍या प्रश्‍नांवर आणि समस्यांवर चर्चा व्‍हायला हवी. आजवरचा इतिहास पाहता, असे होताना दिसत नाही. सत्ताधारी पक्ष आणि विरोधक दोघेही आपण सामान्‍यांसाठी काम करत असल्‍याचे नाटक करतात. प्रत्‍यक्षात ते हातात हात घालून स्‍वतःच्‍या फायद्याचे पाहतात आणि लोकांच्‍या प्रश्‍नांना बगल देतात, अशी टीका पालेकर यांनी केली.

अधिवेशनात गोमंतकीयांचे प्रश्‍न मांडणाऱ्या विरोधकांना आमचा पाठिंबा असेल. मग तो आमदार कोणता पक्षाचा आहे, याच्‍याशी देणेघेणे नाही, पण विरोधी पक्षातील आमदार सत्ताधारी भाजपासोबत हातमिळवणी करणार असतील, तर आमचे दोन आमदार सत्ताधाऱ्यांना सोडणार नाहीत. आमचे दोन आमदार गोमंतकीयांचे प्रश्‍न मांडण्यास सक्षम आहेत, असेही पालेकर म्‍हणाले.

Amit Palekar
दक्षिण कोकणसह गोव्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

क्रूझ सिल्‍वा म्‍हणाले, लोकप्रतिनिधी या नात्‍याने लोकांना भेडसावणारे प्रश्‍न आणि समस्या विधानसभेत चर्चेला येणे आवश्‍यक आहे. गेल्‍या अनेक वर्षांचा इतिहास पाहता सामान्‍यांचे प्रश्‍न बाजूला पडत आहेत आणि भलत्‍याच विषयांवर चर्चा होते. मतदारसंघातील प्रश्‍न सरकारपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. वेन्‍झी व्हिएगस म्‍हणाले, गोमंतकीयांच्‍या समस्या सरकारपर्यंत पोहोचवू. सरकारकडून ठोस आश्‍वासन घेतल्‍याशिवाय आम्‍ही गप्प बसणार नाही. लोकशाहीच्‍या सभागृहात लोकांचे प्रश्‍न पोहोचवणे आमचे कर्तव्‍य आहे.

‘सरकारला घेरण्यासाठी आमचे दोनच आमदार पुरेसे’

काँग्रेस असो, आरजी असो किंवा गोवा फॉरवर्ड असो, गोमंतकीयांचे प्रश्‍न, समस्या मांडणाऱ्यांसोबत आम्‍ही नक्‍की उभे राहू. भलत्‍याच आणि नको त्‍या विषयांवर भांडणाऱ्या विरोधकांशी आम्‍हाला काहीएक देणेघेणे नाही. आमच्‍यासोबत कोणी असो किंवा नसो, सरकारला घेरण्यासाठी आमचे दोनच आमदार पुरेसे आहेत, असे अमित पालेकर यावेळी म्‍हणाले.

100 प्रश्‍न विचारणारः आप

गोमंतकीय नागरिकांनी आपले प्रश्‍न, समस्या आम आदमी पक्षाच्‍या एएपीजीओए ॲट दी रेट डॉट जीमेलवर, आमदारांकडे किंवा पक्षाच्‍या कार्यालयात आणून द्यावेत. पावसाळी अधिवेशात आम आदमी पक्षाकडून दररोज 18 प्रश्‍न विचारले जाणार असून यात 3 तारांकित तर 15 अतारांकित प्रश्‍नांचा समावेश असेल, अशी माहिती अमित पालेकर यांनी दिली. अधिवेशनाच्‍या पूर्ण काळात सरकारला किमान 100 प्रश्‍न विचारू. आमच्‍या आमदारांकडून विचारल्‍या जाणारे प्रश्‍न सोडवण्याची स्‍पष्ट ग्‍वाही सरकारने दिल्‍याशिवाय आम्‍ही सोडणार नाही, असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com