विशेष व्यक्तींसाठी पंचायती राज कायद्यात सुधारणा करा; दिव्यांगजन आयुक्तांचा निर्देश

पावसकर यांनी पंचायत संचालकांना पत्र पाठवले आहे.
विशेष व्यक्तींसाठी पंचायती राज कायद्यात सुधारणा करा; दिव्यांगजन आयुक्तांचा निर्देश
Published on
Updated on

पणजी : पंचायत निवडणूक लढवणे विशेष व्यक्तींचे हक्क असल्याचे सांगून गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी पंचायत संचालनालयाला गोवा पंचायती राज कायद्यात सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. (Amend Panchayati Raj Act for special persons in Goa)

विशेष व्यक्तींसाठी पंचायती राज कायद्यात सुधारणा करा; दिव्यांगजन आयुक्तांचा निर्देश
मेरशी येथे खारफुटी वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल

पंचायत निवडणुकीत विशेष व्यक्तींसाठी एक राखीव जागा किंवा निवडून आलेल्या पंच सदस्यांनी एका विशेष व्यक्तीला पंचायत संस्थेत नेमणे, अशी तरतूद गोवा पंचायती राज कायद्यात करावी, असे निर्देश पावसकर यांनी दिले आहेत.

पावसकर यांनी पंचायत संचालकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘विशेष व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 80 (क) नुसार पंचायत राज संस्था आणि नागरी संस्थांमध्ये विशेष व्यक्तींचे नामांकन अनिवार्य आहे. त्यामुळे ‘पंचायत राज कायदा’ मधील कलम 7 च्या पोटकलम 4 अन्वये विशेष व्यक्तींच्या हितासाठी आवश्यक सुधारणा केली जावी.

विशेष व्यक्तींसाठी पंचायती राज कायद्यात सुधारणा करा; दिव्यांगजन आयुक्तांचा निर्देश
झुआरीच्या विक्रीनंतर गोव्यात तीव्र खत टंचाई

विशेष व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 3 (1) नुसार विशेष व्यक्तींना समानतेचा, सन्मानाने जगण्याचा विशेष व्यक्तींचा अधिकार आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

राज्य सरकारने विशेष व्यक्तींच्या क्षमतेचा योग्य वापर करून त्यांना योग्य वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आणि स्थानिक पंचायत संस्थांमध्ये त्यांचा समान सहभाग सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Karnataka Water Dispute
Sonia Gandhi Education System
Goa CGP Movement
Goa Uncle Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com