Amit Shah: "बनावट ‘हिंमत’ जनतेसमोर उघड" शाहांवर काँग्रेसची बोचरी टीका

भाजपचे नेते ‘म्हादई’च्या मुद्यावर जनतेसमोर सत्य बोलण्याची हिंमत दाखवू शकले नाही : पणजीकर
Goa Government | Amarnath Panajikar
Goa Government | Amarnath PanajikarDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे नेते ‘म्हादई’च्या मुद्यावर जनतेसमोर सत्य बोलण्याची हिंमत दाखवू शकले नाहीत आणि यासाठी त्यांची बनावट ‘हिंमत’ जनतेसमोर उघड झाली आहे, अशी टीका काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली.

पणजीकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी, भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हादई नदीच्या प्रश्नावर राज्य सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, हे कर्नाटकच्या माध्यमांनाही सांगण्याची हिंमत पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे, असे म्हटले होते.

तेव्हा आपण त्यांना आव्हान दिले होते आणि अमित शहा यांच्या सभेत असे विधान करून दाखविण्याचे धाडस दाखवा, असे म्हटले होते.

Goa Government | Amarnath Panajikar
Amit Shah In Goa : काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड; अमित पाटकर संतप्त

आज भाजपच्या एकाही नेत्याने जाहीर सभेत म्हादईच्या मुद्यावर बोलण्याचे धाडस केले नाही. तथापि, शहा यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय योजनांचा फुशारकी मारून मुद्दा वळविण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले.

"काँग्रेस नेते केवळ म्हादईच्या मुद्यावर भाजप नेत्यांकडून स्पष्टीकरण मागून निषेध करण्याचा प्रयत्न करत होते. गोवा सरकार आणि पोलिसांच्या कृतीने भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे."

- अमरनाथ पणजीकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Amit Patkar Goa Congress
home minister amit shah reviews goa st reservation file
Amit Patkar Congress Criticism PM Modi
Amit Shah Smart Border Model Plan
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com