Goa Swearing-in Ceremony: मुख्यमंत्र्यांसह 9 मंत्री देखील होणार शपथबद्ध

पंतप्रधानांची उपस्थिती: राजेशाही शपथविधी
Goa Assembly Swearing Ceremony Updates
Goa Assembly Swearing Ceremony UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रमोद सावंत सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या सोहळ्यात भाजपचे 9 मंत्री शपथबद्ध होतील. यातील आठ मंत्र्यांची नावे निश्‍चित झाली आहेत. मंत्रिमंडळामध्ये महिलांना स्थान दिले जावे, अशी वाढती मागणी असूनही जेनिफर मोन्सेरात किंवा डॉ. दिव्या राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. हा सोहळा ऐतिहासिक पद्धतीने साजरा करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. (Goa Assembly Swearing Ceremony Updates)

Goa Assembly Swearing Ceremony Updates
गोव्यात औद्योगिक गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण निर्माण करा; उद्योजकांच्या प्रमुख संघटनांची मागणी

या भव्य-दिव्य सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत, पंतप्रधानांसह दिग्गज केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि महनीय व्यक्ती. या सोहळ्यासाठी भव्य व्यासपीठ सज्ज केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमवेत दहा राज्यांचे मुख्यमंत्री प्रथमच एकत्रित येत असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही कडक बंदोबस्त ठेवला आहे. दुसरीकडे राज्यात येणाऱ्या महनीय आणि अतिमहनीय पाहुण्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, अथवा दौऱ्यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, याकरता प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. प्रशस्त भोजन व्यवस्था

या सोहळ्यासाठी राज्यातील दहा हजार नागरिक उपस्थित राहतील, असे अपेक्षित धरून या लोकांच्या जेवणाची व्यवस्था डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमशेजारी करण्यात आली आहे. एका स्टॉलवर पाचशे व्यक्ती असे गृहीत धरून 20 स्टॉल उभारण्यात आले आहेत. यासाठी राज्यातील प्रसिद्ध 8 केटरर्सना जेवणाची ऑर्डर देण्यात आली आहे.

शपथविधीसाठी प्रथमच मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच आज गोव्यात येत आहेत. सकाळी 10 वाजता ते विशेष विमानाने दाबोळी विमानतळावर येतील. तिथे खासदार विनय तेंडुलकर, पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला त्यांचे स्वागत करतील. तिथून ते नौदलाच्या खास हेलिकॉप्टरने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमशेजारील हेलिपॅडवर उतरतील. तिथे त्यांचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे स्वागत करतील.

800 पोलिस तैनात

महनीय व्यक्तींच्या सुरक्षेसाठी गोवा पोलिस, राज्य राखीव दल, एसपीजी, पंतप्रधानांची खास सुरक्षा व्यवस्था असे सुमारे 800 जवान तैनात करण्यात आले आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नौदलाच्या खास हेलिकॉप्टरने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताळगावच्या पठारावर उभारलेल्या खास हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने दाखल होतील. चार राज्यांतील मुख्यमंत्री, तसेच देवेंद्र फडणवीस, सी.टी. रवी हे रविवारीच गोव्यात दाखल झाले आहेत.

नऊ मंत्र्यांची नावे निश्चित

आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये माविन गुदिन्हो, विश्वजीत राणे, रोहन खंवटे, बाबूश मोन्सेरात, नीलेश काब्राल, गोविंद गावडे, नीळकंठ हळर्णकर यांच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड, मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. मात्र, भंडारी समाजाचे नेतृत्व करणारे रवी नाईक आणि सुभाष शिरोडकर यांच्यापैकी एकाला मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

Goa Assembly Swearing Ceremony Updates
वार्का येथील रेस्टॉरंटचे बांधकाम पाडण्यास एनजीटीकडून स्थगिती

थेट प्रक्षेपण

या सोहळ्यासाठी येणाऱ्या लोकांची खाण्या-पिण्यासह वाहनांच्या पार्किंगचीही सोय केली आहे. या सोहळ्याला दहा हजार नागरिक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. या सोहळ्याचे विविध प्रसार माध्यमांवर थेट प्रसारणही केले जाणार आहे. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडून मुख्यमंत्र्यांसह 9 मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com