Goa Traffic Department: राज्यात नॉन गिअर वाहन परवानाधारकांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक
Womens|BikeDainik Gomantak

‘हम भी कुछ कम नही’; राज्यात पुरुषांच्या तुलनेत २९ टक्के अधिकृत महिला वाहनचालक

Goa Traffic Department: राज्यात नॉन गिअर वाहन परवानाधारकांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक
Published on

Traffic Department Goa

पणजी: सध्याच्या आधुनिक युगात महिला सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून वावरत आहेत. राज्यात वाहन चालविण्यातही महिलांनी ‘हम भी कुछ कम नही’, हे आपल्या कृतीतून दाखविले आहे. पुरुषांच्या तुलनेत त्यांचा टक्का थोडा कमी असला, तरी वाहनचालक महिलांचे हे प्रमाण आशादायक आहे.

राज्याची एकूण लोकसंख्या २० लाखांच्या आसपास आहे. त्यात वाहन चालविण्याचे परवाने १३ लाख ४ हजार ६४२ लोकांकडे आहेत. यामध्ये पुरुषांची संख्या १० लाख १० हजार ९१५ आणि महिलांचाही संख्या २ लाख ९३ हजार ७२७ आहे. राज्यात पुरुषांच्या तुलनेत जवळपास २९ टक्के अधिकृत महिला वाहनचालक आहेत.

चारचाकी वाहनधारकांमध्ये पुरुषांची संख्या ३ लाख ७६ हजार ६६० आणि महिलांची संख्या १ लाख २० हजार ६१९ आहे. तसेच व्यावसायिक नोंदणीकृत परवानाधारकांमध्ये महिलांची संख्या केवळ ५४३ आणि पुरुषांची संख्या १ लाख ३३ हजार २३५ आहे. राज्यात अपघातांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्यास किंवा निष्काळजीपणे वाहन चालविताना पकडल्यास परवाने निलंबित करण्याचे सत्र देखील विभागाने राबविले आहे. अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाकडून पावले उचलली जात असली तरी अपघात सत्र सुरूच आहे.

Goa Traffic Department: राज्यात नॉन गिअर वाहन परवानाधारकांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक
Bicholim Traffic Signal: ..अखेर डिचोलीतील ‘सिग्नल यंत्रणा’ कार्यान्वित! वाहनचालकांमध्ये समाधान

तीन वर्षांत ३०,१६१ परवाने निलंबित

राज्यात गेल्या काही वर्षांपासून अपघातांची संख्या वाढली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने ‘ब्लॅकस्पॉट’ निश्‍चित केले असले, तरी त्याचा जास्त फायदा झाल्याचे दिसत नाही. तसेच अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निष्काळजीपणे वाहन चालविलेल्यांवर देखील कारवाई करण्यात आली. २०२१ ते आजवर राज्यात निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल ३०,१६१ परवाने निलंबित केल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

‘नॉन गिअर’मध्ये पुरुषांचा टक्का कमी

वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गिअर परवाना धारकांमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे, तर नॉन गिअरमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. गिअर वाहनधारकांमध्ये पुरुषांची संख्या ४,०९,५५२ आणि महिलांची संख्या ११,००९ आहे. याउलट नॉन गिअरमध्ये महिलांची संख्या १,६१,५५६ आणि पुरुषांची संख्या ९१,४६८ आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com