Labour Day: समाजवादी व्यवस्था हा एकमेव पर्याय, भांडवली व्यवस्थेने मानवजातीला फसवलंय; राजधानी पणजीत घुमला श्रमिकांचा आवाज

International Labour Day 2025: या मोर्चाद्वारे सर्व भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कामगार वर्गाच्या लढ्यांना ऐक्य व पाठिंबा दर्शविण्यात आला.
AITUC
AITUC Protest at Azad MaidanDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) आणि त्यांच्या संलग्न कामगार संघटनांनी गुरुवारी १ मे रोजी पणजीत भव्य कामगार मोर्चा काढला. दरम्यान, हजारो कामगारांनी विविध उद्योग, खाणी, गोदी, शासकीय, वाहतूक आणि व्यापारी आस्थापनांमधून सहभागी होत, हातात फलक घेउन जोरदार घोषणा देत मोर्चात भाग घेतला.

मोर्चाची सांगता चर्च स्क्वेअरजवळील गार्सिया द ऑर्टा गार्डन येथे सार्वजनिक सभेने झाली. या ठिकाणी आर. डी. मंगेशकर यांनी कामगारांचे स्वागत केले. सभेला राज्य महासचिव क्रिस्तोफर फोन्सेका, अध्यक्ष प्रसन्न उत्तगी, उपमहासचिव आर. डी. मंगेशकर, सचिव सुहास नाईक आणि इतर नेत्यांनी मार्गदर्शन केले.

या मोर्चाद्वारे सर्व भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कामगार वर्गाच्या लढ्यांना ऐक्य व पाठिंबा दर्शविण्यात आला. वेतन, सुरक्षित कामकाजाची ठिकाणं, सामाजिक सुरक्षा, निवृत्ती वेतन व शोषणमुक्त जीवनासाठी संघर्ष करणाऱ्या कामगारांना ऐक्याचा संदेश सभेमार्फत देण्यात आला.

AITUC
Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा, प्रवाशांचा खोळंबा

भांडवली व्यवस्था अपयशी

भांडवली व्यवस्थेने मानवजातीला फसवले आहे. फक्त नफ्यावर लक्ष केंद्रित करून समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याने ही व्यवस्था अपयशी ठरली आहे. या अपयशातून बाहेर पडण्यासाठी समाजवादी व्यवस्था ही एकमेव पर्याय असल्याचे आयटक राज्य महासचिव क्रिस्तोफर फोन्सेका यांनी स्पष्ट केले.

पहलगाम हल्ल्याचा निषेध

२४ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील निरपराध पर्यटकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत संपूर्ण राष्ट्रासोबत ऐक्य दर्शविण्यात आले. या पार्श्वभूमीवर विचारपूर्वक व संयमित पद्धतीने पावले उचलण्याचे आवाहन आयटकतर्फे करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com