'द्रौपदी मुर्मू यांनी मणिपूरलाही भेट द्यावी', राष्ट्रपतींच्या गोवा दौऱ्यावरून काँग्रेसची खोचक टीका

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मंगळवारी गोव्यात आल्या आहेत.
President Droupadi Murmu Goa Visit congress
President Droupadi Murmu Goa Visit congress Dainik Gomantak

President Droupadi Murmu Goa Visit congress: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज (मंगळवार) गोव्यात आल्या आहेत.  राष्ट्रपतींच्या तीन दिवसीय गोवा दौर्‍याचे गोवा काँग्रेसने स्वागत केले आहे.

तसेच, सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेल्या मेहनतीचे मला कौतुक वाटते असे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विजय भिके म्हणाले.

"मला वाटतं की राष्ट्रपतींनी मणिपूरलाही भेट द्यावी कारण तिथं आपल्या लोकांना त्रास होत आहे. हा भारताचा भाग आहे आणि त्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी तिथे भेट द्यायला हवी. मणिपूरच्या मुद्द्यावर सरकार बोलत नाही, म्हणून मी माननीय राष्ट्रपतींना मणिपूरवर विधान करण्याची विनंती करतो." असे विजय भिके म्हणाले. मणिपूरच्या जनतेनेही देशाच्या विकासासाठी योगदान दिले आहे असे ते म्हणाले.

संभाजी भिडेंवर बंदी घाला, गोव्याच्या सामाजिक सलोख्याचे रक्षण करा: काँग्रेस

हिंदुत्ववादी कार्यकर्ते संभाजी भिडे यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त करत त्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे.

President Droupadi Murmu Goa Visit congress
भाषणाची सुरूवात आणि शेवट कोकणीत, राष्ट्रपती गोव्यातील नागरी सत्कारानंतर काय बोलल्या?

"संभाजी भिडे यांच्यावर अनेक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रमोद मुथालिक यांच्यावर बंदी आहे, मग ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्या संभाजी भिडेंवर बंदी का नाही? महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनीही त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे." असे विजय भिके म्हणाले.

संभाजी भिडे सारख्या व्यक्तीला सभेला संबोधित करण्याची परवानगी दिल्यास जातीय तेढ वाढेल आणि राज्यातील जातीय शांतता बिघडेल. अशी चिंता काँग्रेसने व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com