मुरगावात ज्येष्ठांसाठी अखिल गोवा चालण्याची शर्यत; प्रसिद्ध अभिनेते मिलींद गुणाजींच्या हस्ते शर्यतीला सुरुवात

वर्षपध्दतीप्रमाणे मुरगाव पत्रकार लेखक संघातर्फे ज्येष्ठांसाठी अखिल गोवा चालण्याच्या शर्यतीचे आयोजन स्वतंत्रपथ मार्गावर घेण्यात आली.
All Goa Walking Race
All Goa Walking RaceDainik Gomantak
Published on
Updated on

All Goa Walking Race: मुरगाव पत्रकार लेखक संघ आयोजित 15 व्या ज्येष्ठांसाठी अखिल गोवा चालण्याच्या शर्यतीत 60 ते 70 वयोगटातील सुरेश फडते (आल्त दाबोळी), 70 वर्षा वरील गटात सखाराम भगत (मायमोळे) तर 60 वर्षा वरील महिला गटात परपेच्यूआ फर्नांडिस (काणकोण ) यांनी अनुकमे प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकावले.

वर्षपध्दतीप्रमाणे मुरगाव पत्रकार लेखक संघातर्फे ज्येष्ठांसाठी अखिल गोवा चालण्याच्या शर्यतीचे आयोजन स्वतंत्रपथ मार्गावर घेण्यात आली. सदर स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. स्पर्धेला सुरुवात जोशी चौकातून करण्यात आली. प्रसिद्ध अभिनेते मिलींद गुणाजी, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्याहस्ते भगवा दाखवून या चालण्याच्या शर्यतीला सुरुवात करण्यात आली.

All Goa Walking Race
Chala Hawa Yeu Dya: भाऊ, कुशल, श्रेयाचा गोव्यात सन्मान; मिळाली अमूल्य भेट

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे :

वयोगट 60 ते 70 वर्षे पुरुष गट :

प्रथम बक्षीस - सुरेश फडते (आल्त दाबोळी), दुसरे बक्षीस - उदय नाईक (वास्को) व तिसरे बक्षीस - अरुण आजगांवकर (बेलाबाय).

वयोगट 70 वर्षावरील पुरुष गट :

प्रथम बक्षीस - सखाराम भगत (मायमोळे), दुसरे बक्षीस - श्रीकांत कळंगुटकर (वास्को), तिसरे बक्षीस - पुंडलीक डिचोलकर (वास्को).

महिला गट 60 वर्षावरील :

प्रथम बक्षीस - पेरपेच्युआ फर्नांडिस (काणकोण), दुसरे बक्षीस - सुनंदा नाईक (वास्को) तिसरे बक्षीस - जयश्री धुरी (वास्को).

तिनही गटात मिळून एकूण 26 स्पर्धकांनी या चालण्याच्या शर्यतीत भाग घेतला होता. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, तर विशेष अतिथी म्हणून संकल्प आमोणकर, तर मुख्य प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिध्द सिने अभिनेते मिलींद गुणाजी, रात्रीच खेळ चाले फेम अभ्यंकर नाईक हे मुख्य आकर्षण ठरले.

यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर उद्योजक उमेश साळगावकर, नगराध्यक्ष लिओ रॉड्रीक्स, संजय सातार्डेकर, चिखली पंचायत सरपंच कमला प्रसाद यादव, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसा दाखल रोख रक्कम व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार मिलींद काकोडकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन पत्रकार संतोष खोरजूवेकर यांनी केले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com