South Goa: विरियातो 'नवखे' तर पल्लवींच्या 'उपलब्धते'ची शंका; साऱ्यांचे लक्ष दक्षिण गोव्याकडेच

South Goa: भाजपने मात्र आपल्या सुसंघटित प्रचार मोहिमेद्वारे दक्षिणेचा कानाकोपरा पिंजून काढला.
Pallavi Dempo And Viriato Fernandes
Pallavi Dempo And Viriato FernandesDainik Gomantak
Published on
Updated on

South Goa Loksabha

उत्तर गोवा मतदारसंघ काहीसा सोपा आहे, असा भाजप नेतृत्वाने समज करून घेतला आहे. त्यांना दक्षिण गोवा कठीण वाटतो. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने गेला महिनाभर सारी ताकद तेथे उभी केली आहे.

संसाधने कमी असली तरी कॉंग्रेस पक्ष तेथे अत्यंत चिवट झुंज देतो आहे. सासष्टीत ८० टक्के मतदान झाले तर काँग्रेस उमेदवार विजयाच्च्या निकट पोहोचू शकेल.

दक्षिणेत, विशेषतः सासष्टीत ख्रिस्ती मतदार अत्यंत जागृत आहे. शिवाय चर्च धर्मसंस्था यावेळी अधिक संवेदनशील बनली आहे. गेल्या आठवड्यात चर्चमध्ये 'पवित्र तास' पाळला. यावेळी खास प्रार्थना म्हणण्यात आल्या. 'जबाबदार' उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन धर्मगुरूंनी केले. सूत्रांच्या माहितीनुसार, एका अंत्यसंस्काराच्या वेळीही एका धर्मगुरूने हा राजकीय संदेश दिला.

दुसऱ्या बाजूला हिंदूंनाही 'योग्य मार्ग' दाखविण्यास स्वामी महाराज मागे नव्हते. ब्रह्मेशानंद महाराजांनी हिंदूंच्या धर्मरक्षणार्थ काम करणाऱ्या घटकांना मतदान करण्याचे आवाहन केले. माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी भाजपला पाठिंबा दिला व कॉंग्रेस पक्षावर अप्रत्यक्ष टीका केली. दोन्ही धर्मांचे प्रमुख प्रत्यक्ष निवडणुकीत आक्रमकरित्या सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कॉंग्रेस पक्षाकडे निधीचा तुटवडा असल्याचे चित्र यावेळी दिसले. त्यांचे उमेदवार विरियातो फर्नांडिस हे सर्व मतदारांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. अनेक ग्रामीण भागात त्यांचा चेहरा लोक पाहू शकले नाहीत. त्यामुळे सांगे, सावर्डेसारख्या भागात तो 'अनोळखी' चेहरा असल्याचे मतदारांना वाटते.

Pallavi Dempo And Viriato Fernandes
First Private Train: देशातील पहिल्या खासगी ट्रेनचे बुकिंग सुरू; गोवा, मुंबईसह अयोध्येला करता येणार प्रवास

भाजपने मात्र आपल्या सुसंघटित प्रचार मोहिमेद्वारे दक्षिणेचा कानाकोपरा पिंजून काढला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यांच्या प्रचारसभांमध्ये लोक उत्साहाने सहभागी झाले. हा जमाव घोषणा देत होता व चैतन्यदायी होता.

असे असले तरी हिंदू बहुजन समाजासाठी भाजप उमेदवार पल्लवी धंपे या भविष्यात 'दुर्लभ' ठरू शकतील व त्यांना प्रत्यक्षात भेटणे कठीण होईल असे वाटते. परंतु भाजपने महिलेला उमेदवारी देणे याचा खूपच सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे मानणारा एक वर्ग आहे.

दोन्ही उमेदवारांना समसमान संधी!

भाजपकडे दोन्ही मतदारसंघांत आमदारांची संख्या मोठी आहे. ३३ आमदार या पक्षाला पाठिंबा देत आहेत व 'मोदींची गॅरेंटी' ही त्यांच्याकडे मोठी घोषणा आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'इंडिया' आघाडीने स्थानिक विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे.

दक्षिणेत काँग्रेसकडे केवळ दोन आमदार असून संघटनात्मकरित्या मतदारांना घराबाहेर काढणे त्यांच्यासाठी मोठे आव्हानात्मक ठरणार आहे. निवडणूक विश्लेषक क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो यांच्या मते दक्षिणेत दोन्ही उमेदवारांना समसमान संधी आहे. वेळ्ळी व बाणावलीमध्ये काँग्रेस खूप मोठे मताधिक्य प्राप्त करू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com