पणजी: राज्यातील सर्व म्हणजे ३२२ भंगारअड्डे बेकायदा असल्याची माहिती सरकारने विधानसभेत उत्तरात दिली आहे. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी याविषयी प्रश्न विचारला होता.
सरकारने लेखी उत्तरात म्हटले आहे की, राज्यात एकही भंगारअड्डा कायदेशीररित्या सुरू नाही. गोवा कचरा प्रक्रिया महामंडळाने उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून याविषयी माहिती संकलित केली आहे. या अड्ड्यांवर कारवाई करावी यासाठी महामंडळाने भू-महसूल संहितेच्या कलम ३३ नुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार सादर केली आहे.
हे भंगारअड्डे हटविण्यासाठी सरकारी जमिनीचा शोध सुरू आहे. ही जमीन सापडली की ती औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित केली जाणार आहे. तेथे भंगारातील वस्तूवर प्रक्रिया, फेरविक्रीस चालना दिली जाईल. शक्य तितक्या लवकर उत्तर गोव्यातील ११८ आणि दक्षिण गोव्यातील २०४ भंगार अड्डे औद्योगिक विभागात हलवले जातील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.