Goa Politics: 'मला मंत्रिमंडळात ठेवायचं की काढून टाकायचं मुख्यमंत्री ठरवतील...'; आलेक्स सिक्वेरा यांनी स्पष्टच सांगितलं

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी माझी दीड तास चर्चा झाली. मात्र यादरम्यान कोणत्याही राजकीय मुद्द्यावर चर्चा झाली नाही.
Aleixo Sequeira and CM Pramod Swant
Aleixo Sequeira Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक बड्या नेते सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. मायकल लोबो यांनी मुख्यमंत्र्यांच्या समवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सोमवारी (30 जून) भेट घेतली. याचदरम्यान आता अनेक विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असे संकेत मिळत आहेत. यापैकीच एक नाव आलेक्स सिक्वेरा यांचे असल्याचे सांगितले जात आहे.

'मला मंत्रिमंडळात ठेवायचे की नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा'

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी माझी दीड तास चर्चा झाली. मात्र यादरम्यान कोणत्याही राजकीय मुद्द्यावर चर्चा झाली नाही. मी पुढच्या आठवड्यात गोव्यात येणार असून विधानसभेच्या अधिवेशनात माझ्या विभागाशी संबंधित प्रश्नांची उत्तरेही देणार आहे. मी फक्त एवढेच सांगेन की, मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांना मला मंत्रिमंडळात ठेवायचे की काढून टाकायचे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी गोमंतक टीव्हीशी बोलताना सांगितले.

Aleixo Sequeira and CM Pramod Swant
Goa Politics: कोणाला डच्चू? कोणाला लॉटरी? CM सावंत, आरोग्यमंत्री राणे दिल्लीत; मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता

दरम्यान, पर्यावरण आणि बंदर खात्याचे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळातून नारळ मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सिक्वेरा यांचा काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आठ आमदारांमध्ये समावेश होता. तत्कालीन बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांचा तातडीने राजीनामा घेऊन आलेक्स यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती.

Aleixo Sequeira and CM Pramod Swant
Goa Politics: 'मायकल' होणार 'मंत्री'? दिल्लीत मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत घेतली अमित शहांची भेट

मायकल लोबोंच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ!

दुसरीकडे, आमदार मायकल लोबो (Michael Lobo) यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याबरोबर सोमवारी (30 जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. आता ते केंद्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांचीही भेट घेणार आहेत. राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा असताना लोबो आणि शहा यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. आमदार लोबो दाम्पत्यापैकी कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोबो यांचे मंत्रिपद निश्चित झाले असून, त्यासाठीच ते दिल्लीला पोहोचले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com