Aldona: होय, हळदोणेत बेकायदा बांधकामे! गाव सांभाळण्यात आमदार पडले कमी; ग्लेन टिकलो यांचा पलटवार

Glenn Ticlo: भाजपाचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी आरोपांचे एकप्रकारे समर्थन करून, हळदोणे गावात अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे मान्य केले.
Glenn Ticlo, Aldona News
Glenn TicloDainik Gomantak
Published on
Updated on

Glenn Ticlo About Illegal Constructions In Aldona

म्हापसा: हळदोणे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी करून जमिनींचे रूपांतर होत आहे. परिणामी बेकायदा बांधकामे उभी रहात आहेत, असा आरोप अलीकडेच विद्यमान आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी केला होता.

त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी वरील आरोपांचे एकप्रकारे समर्थन करून, हळदोणे गावात अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे मान्य केले. मंगळवारी टिकलोंनी माध्यमांशी म्हापशात संवाद साधताना वरील प्रतिक्रिया दिली.

मागील तीन वर्षांत हळदोणेतील जमिनीत बेकायदा बांधकामे फोफावली आहेत, याला टिकलो यांनी दुजोरा दिला. त्याचप्रमाणे या बांधकामांना त्यांनी विद्यमान आमदार कार्लुस फेरेरा यांना जबाबदार धरले.

याशिवाय अनधिकृत बांधकामे येत असताना आमदारांनी सक्रिय जागृकता दाखवली नाही. किंबहुना त्यांनी सरकारला योग्य सल्ला दिला नाही, असेही टिकलो म्हणाले. कारण आमदार फेरेरा हे आपण मुख्यमंत्री व सरकारला सल्ला देतो, असे दावे करतात. मग आता फेरेरा कुठे गायब झाले. या गैरप्रकारांना फेरेरा हेच जबाबदार आहेत, अशी प्रतिक्रिया टिकलो यांनी दिली. दहा वर्षे हळदोणेचा आमदार असताना मी गाव सांभाळला, परंतु मागील तीन वर्षांत फेरेरांनी हळदोणेचे गावपण उद्ध्वस्त केले, असा आरोप टिकलोंनी यावेळी केला.

ग्लेन टिकलो यांचे हे आरोप अप्रत्यक्षरीत्या भाजपा सरकारच्या चुकांकडे बोट दाखविणारे होते. कारण शेवटी बांधकामांना आवश्यक असणाऱ्या परवानग्या व जमीन रूपांतरे प्रशासकीय पातळीवरच होतात. कदाचित माजी आमदार टिकलो यांना याचा विसर पडला असे त्यांच्या बोलण्यावरून दिसते.

Glenn Ticlo, Aldona News
Aldona: माजी मुख्य सचिवांना क्लिन चीट; 'हळदोणे' झोनबदलबाबत सरकारने मांडली भूमिका

‘बेकायदा प्रकारांना आमदारच जबाबदार’

आमचा बांधकामांना विरोध नाही, परंतु मूलभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या हळदोणेतील सहाही पंचायत कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जमीन रूपांतरे होत आहेत, असा दावा टिकलो यांनी यावेळी केला. या बेकायदा प्रकारांना आमदार जबाबदार असून तीन वर्षांनी ते जागे झाले आहेत आणि हळदोणेत अनधिकृत बांधकामे येत असल्याचा आरोप करीत आहेत ही हास्यास्पद गोष्ट असल्याचे टिकलो म्हणाले.

Glenn Ticlo, Aldona News
Illegal Houses In Aldona: हळदोणातील 60 बेकायदा घरांवर चालणार बुलडोझर, समिती ठाम; प्रसंगी कोर्टात जाण्याची तयारी!

‘फेरेरांनी हवेत आरोप करू नयेत’

विद्यमान आमदारांनी या बेकायदा गोष्टीत माझा सहभाग आहे, याचा एकतरी पुरावा दाखवावा. हवेत आरोप करून चालत नसतात. त्यांना आपले आरोप सिद्ध करता येत नसल्यास, मी सिद्ध करून दाखवतो की फेरेरांचा यामध्ये सहभाग कसा आहे, असे आव्हान टिकलो यांनी फेरेरा यांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com