Goa Crime News: चिंताजनक! गोव्यात तीन वर्षात 1569 मुली-महिला बेपत्ता; देशातील संख्या 13 लाखांवर...

केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिली माहिती
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

Goa Crime News: देशात एकीकडे विविध पातळ्यांवर महिला सुरक्षेसाठी विविध प्रयत्न, महिला सबलीकरणाच्या विविध योजना राबवल्या जात असताना दुसरीकडे महिला आणि मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे समोर आले आहे.

सन 2019 ते 2021 या काळात सुमारे 13 लाख 13 हजार 078 मुली-महिला बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांनी राज्यसभेतील उत्तरातून दिली आहे.

Goa Crime News
Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेलच्या किंमती स्थिर; दक्षिण गोव्यातील दरांमध्ये घट

या काळात गोव्यातून 1569 मुली-महिला बेपत्ता झाल्याची माहिती आहे. यात 1490 महिला तर 79 मुलींचा समावेश आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या उत्तरानुसार राज्यात मुलींच्या तुलनेत महिलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे.

2019 मध्ये एकूण 550 महिला बेपत्ता झाल्या होत्या तर त्या वर्षात ३७ मुली बेपत्ता झाल्या होत्या. 2020 मध्ये 25 मुली आणि 480 महिला बेपत्ता झाल्या होत्या. तर 2021 मध्ये 17 मुली बेपत्ता झाल्या होत्या तर महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण या वर्षात 460 इतके होते.

दरम्यान, मुली-महिला बेपत्ता होण्याच्या सर्वाधिक घटना मध्य प्रदेशात घडत असल्याचे समोर आले आहे.

Goa Crime News
Goa Monsoon Update: दिलासादायक! पावसाचे इंचांचे 'शतक' पूर्ण

मुलींच्या जन्माला नकारात्मक मानू नये, महिलांनी मुलींना जन्म द्यावा, यासाठी केंद्र सरकारकडून बेटी बचाओ, बेटी पढाओ सह मुली-महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जातात. शिवाय विविध राज्य सरकारांकडूनही अशाच योजना राबवल्या जात असतात. पण मुली-महिला बेपत्ता होण्याचे प्रकारही वाढत आहेत.

यात बहुतांशदा ह्युमन ट्रॅफिकिंगसाठीच मुलींचे अपहरण केल्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा, पोलिसांसह नागरिकांनाही सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com