Nesai Murder Case: नेसाय येथे सापडला सडलेला मृतदेह; पोलिसांनी व्यक्त केला खुनाचा संशय

नेसाय कालव्यावर अनुचित प्रकार वाढले
Nesai Murder Case
Nesai Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून आज सकाळी नेसाय येथील कालव्याच्या बाजूला एका 21 वर्षे युवकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. हा खुनाचा प्रकार असू शकतो असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणात पोलीस चौकशी सुरु आहे.

(Akhtar Raza body has been found at Nesai canal)

मिळालेल्या माहितीनुसार नेसाय येथील कालव्याच्या बाजूला सापडलेला मृतदेह हा अख्थर रजा (21) या युवकाचा असून हा युवक दिकरपाली येथे राहत होता. रजा हा रविवारपासून तो बेपत्ता होता आज सकाळी या कालव्याकडून जाणाऱ्या लोकांना हा मृतदेह आढळल्याने नागरीकांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे.

Nesai Murder Case
Vijai Sardesai On Mhadei: ...अन्यथा बार्देश, सांगेचा पाणीप्रश्न पेटणार

या संदर्भात दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक दहानिया यांनी माहिती देताना स्पष्ट केले आहे की, हा मृत्यू आहे. अथवा खुनाचा प्रकार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेहाचा शवचिकित्सा अहवाल आल्यानंतर हे कारण समजू शकेल.

Nesai Murder Case
Joseph Sequeira: ‘बिल्डर्स’पासून समुद्रकिनारे वाचवा!

स्थानिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हा युवक मासे विकायचे काम करायचा. रविवारी दुपारी मासे विकून तो घरी आला होता. दुपारी जेवण करून तो बाहेर निघाला पण परत घरी आलाच नाही. रात्री एकदा त्याने फोन केला होता. मात्र नंतर त्याचा फोन बंद लागल्याने दुसऱ्या दिवशी हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली. याचा मृतदेह इतका कुजलेल्या अवस्थेत होता की त्याची ओळख पटणे शक्य नव्हते. मात्र त्याने घातलेल्या चपलावरून त्याचे ओळख पटवण्यात आली.

दरम्यान नेसाय येथील कालव्यावर अनुचित प्रकार घडतात, अशी माहिती स्थानिक नेते पीटर वियेगस यांनी दिली. या कालव्यावर अनेक युवक दारू पितात, काहीजण ड्रग्सही घेतात. त्यामुळे या भागात पोलिसांची गस्त ठेवावी, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. या भागात रात्रीच्यावेळी थांबण्यास मज्जाव करावा अन्यथा त्याचे दुष्परिणाम स्थानिक लोकांना सहन करावा लागेल असे विएगस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com