Goa Monsoon Session: गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर, 'हे' मुद्दे गाजण्याची शक्यता

गोव्याचे पावासाळी अधिवेशन 18 18 दिवस अधिवेशन चालणार आहे.
Goa Monsoon Session 2023
Goa Monsoon Session 2023Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Monsoon Session 2023: गोवा विधानसभा अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यपाल पी. एस. पिल्लई यांनी अधिवेशनाची घोषणा केली आहे. यावेळी 18 दिवस अधिवेशन चालणार असून, यावेळी विविध अधिवेशन काळात स्मार्ट सिटी यासह विविध मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.

गोव्याचे पावासाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार आहे. 18 दिवस अधिवेशन चालणार आहे. आज (शुक्रवारी) राज्यपाल पिल्लई यांनी याबाबत माहिती दिली आहे.

या अधिवेशन काळात स्मार्ट सिटी पणजीतील रखडलेली कामे, मागील अधिवेशन काळापासून गाजत असलेला म्हादईचा मुद्दा, राज्यातील गुन्हेगारी, अपघात यासह विविध मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. ऐन पावसाळ्यात पणजीत रखडलेली विविध विकासकामे यामुळे सत्ताधारी भाजपला विरोध पक्ष घेरण्याचा प्रयत्न करतील. तसेच, राज्यातील वाढते रस्ते अपघातांवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

18 जुलै रोजी सुरू होणारे अधिवेशन 10 ऑगस्ट रोजी समाप्त होईल, यामध्ये शनिवारी आणि रविवारच्या सहा सुट्टया वगळून 18 दिवस अधिवेशन चालेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Horoscope Today October 1, 2026
Horoscope Today September 29, 2026
Monsoon Withdrawal From Rajasthan
Goa Assembly three day session
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com