Ponda News : अ. का. प्रियोळकर बहुआयामी व्यक्तिमत्त्व!

मीना वैशंपायन : कोने-प्रियोळात पुस्तकांचा लोकार्पण सोहळा
Book launch ceremony
Book launch ceremonyDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले गोमंतकीय अ. का. प्रियोळकर यांना त्यावेळी गोव्यातील पोर्तुगीज छळाची चीड होती आणि त्यांच्या लेखातून ती प्रतीत झाली आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची क्षमता बाळगणारा हा संशोधक आणि साहित्यिक मराठी भाषेचा पुरस्कर्ता होता. मराठीला त्यांनी प्राधान्य दिले, असे उद्‍गार प्रियोळात एशियाटिक संस्थेच्या पदाधिकारी आणि लेखिका डॉ. वैशंपायन यांनी काढले.

कोने - प्रियोळ येथे काल सृजन संवाद या संस्थेतर्फे अ. का. प्रियोळकर यांच्या निर्वाणाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या घरी आयोजित एका कार्यक्रमात वैशंपायन यांनी अ. का. प्रियोळकर यांच्या स्मृतीला उजाळा दिला. यावेळी पत्रकार परेश प्रभू, कुमार प्रियोळकर तसेच सृजन संवादचे अध्यक्ष अनुप प्रियोळकर आदी मान्यवर उपस्थित होते. अ. का. प्रियोळकर यांच्यावरील प्रकाशित दोन

Book launch ceremony
Ponda Municipal Election 2023: प्रभाग 5 मधील 'ही' अपूर्ण कामे विकास कामात ठरताहेत अडथळा

पुस्तकांचे लोकार्पणही यावेळी झाले.

प्रभू म्हणाले, अ. का. प्रियोळकर म्हणजे एक ज्ञानसाधक होते. आपल्या घराचा आपल्या गावाचा प्रभाव त्यांच्या साहित्यातून उमटला. मूल्याधारित असे त्यांचे लिखाण होते, जे गोमंतकीयांना अभिमानास्पद असल्याचे परेश प्रभू यांनी सांगितले. स्वागत व प्रास्ताविक अनुप प्रियोळकर यांनी केले. सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी तर पांडुरंग नाडकर्णी यांनी आभार मानले.

Book launch ceremony
Ponda Power Lines : वीज वितरणातून ग्राहकांना चांगले ते देणार!

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक

वैशंपायन म्हणाले, अ. का. प्रियोळकर यांनी कोणत्याही आधाराविना काहीही लिहिले नाही. आपण जे काही सांगतो आहोत, त्याला सक्षम आणि भक्कम असा पुरावा आहे का. हे तपासूनच त्यांनी लिहिले, म्हणून ते वास्तववादी ठरले. पाठचिकित्सक पद्धतीचा अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. जेजुईट लोकांचे साहित्य मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी मोठे काम केले. सतराव्या शतकातील हे किचकट काम करण्याचे धाडस प्रियोळकर यांनी केले आणि ते तडीस नेले. एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असा हा साहित्यिक होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com