Airplane
Airplane Dainik Gomantak

Daboli Airport: ‘दाबोळी’वरील बुकिंग रद्द; दक्षिणेतील प्रवासी गोत्यात

Mopa Airport: ‘मोपा’ला प्राधान्‍य : काही विमान कंपन्यांनी फिरविली पाठ
Published on

Daboli Airport: मोपा विमानतळ 5 जानेवारीपासून अधिकृतरित्या सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर काही विमान कंपन्यांनी दाबोळी विमानतळावरील उड्डाणे रद्द करण्यास सुरुवात केली असून त्यांनी दाबोळीऐवजी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्राधान्य देणे सुरू केले आहे. यामुळे दक्षिण गोव्यातील प्रवासी गोत्यात आले आहेत.

याविषयी विमान तिकिटांचे बुकिंग करणाऱ्या काही एजंटशी संपर्क साधला असता, आमच्या काही ग्राहकांना त्यांची ‘पूर्वीची बुकिंग रद्द केली असून तुमचे पैसे परत घ्या’ अशा आशयाचे संदेश येऊ लागले आहेत. मात्र, हीच विमाने आता त्याच वेळापत्रकानुसार मोपा विमानतळावरून सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन्ही विमानतळांवर कर्मचारी नेमणे विमान कंपन्यांना परवडण्यासारखे नसल्याने बहुतेक विमान कंपन्या दोन्हीपैकी कुठल्या तरी एकाच विमानतळाला प्राधान्य देतील, असे संकेत सध्या मिळत आहेत. दक्षिण गोव्यातील एका प्रवाशाने आपले दाबोळीवरील बुकिंग

रद्द झाल्याचा विमान कंपनीचा संदेश आल्याची माहिती दिली. ‘तिकीट बुक केलेले विमान त्यादिवशी सुटणार नसल्याने तुमचे पैसे परत घेऊन जावेत’ असे या संदेशात म्हटले होते. या प्रवाशाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गोवा-मुंबई-डेहराडून या हवाई मार्गावरील दोन तिकिटे बुक केली होती. संदेश आल्यावर या प्रवाशाने अधिक चौकशी केली असता, या विमान कंपनीने त्याच दिवशी आणि त्याच वेळी हे विमान मोपाहून सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली. अन्य प्रवाशांनाही असाच अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.

मडगाव येथील विमान तिकीट बुकिंग एजंट एराज मुल्ला यांना याविषयी विचारले असता, काहीजणांना असा संदेश आला असल्याची माहिती दिली. या सर्व प्रवाशांवर आता नव्याने तिकीट बुक करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले.

Airplane
Goa: बेघर महिला-पुरुषांना ‘स्ट्रीट पॉव्हिडन्स’ संस्था ठरतेय हक्काचा निवारा

‘दाबोळी’वरील उलाढाल मंदावली

मोपा विमानतळ सुरू होणार, हे जाहीर झाल्यावर बुकिंग पद्धतीत काही बदल झाला का, असे एजंटना विचारले असता, आता तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांना दोन पर्याय उपलब्ध झाल्याने उत्तर गोव्यातील प्रवाशांनी दाबोळीकडे पूर्णतः पाठ फिरवली असून त्यांनी मोपावरच तिकीट बुकिंग करणे सुरू केले आहे. त्यामुळे दाबोळीवरील उलाढाल बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

  • ‘इंडिगो’, ‘गो-फर्स्ट’ची दाबोळीवरील उड्डाणे 1 जानेवारीपासून बंद.

  • पैसे परत नेण्यासाठी विमान कंपन्यांकडून प्रवाशांना संदेश.

  • ‘दाबोळी’वरून रद्द झालेली विमाने ‘मोपा’वरून सुटणार.

‘इंडिगो’ आणि ‘गो-फर्स्ट’ या दोन विमान कंपन्यांनी यापूर्वीच दाबोळीवरील उड्डाणे 1 जानेवारीपासून बंद होणार, असे जाहीर केले आहे. त्यामुळे इतर कंपन्याही तसेच करतील, असे वाटते. - परशुराम सोनुर्लेकर, तिकीट बुकिंग एजंट, वास्को.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com