Goa Flight: एअर इंडिया एक्स्प्रेसची मोठी घोषणा, 15 एप्रिलपासून मोपावरून 5 शहरांसाठी थेट विमानसेवा; वाचा यादी

Air India Express Flights: १५ एप्रिल २०२५ पासून मोपा विमानतळावरून देशातील पाच प्रमुख शहरांमध्ये विमानसेवा दिली जाणार आहे
Mopa Airport flights
Mopa Airport flightsDainik Gomantak
Published on
Updated on

Air India Express announces operations from MOPA

मोपा: गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या विमानसेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. १५ एप्रिल २०२५ पासून, मोपा विमानतळावरून देशातील पाच प्रमुख शहरांमध्ये विमानसेवा दिली जाणार आहे. देशांतर्गत लोकांचा विमानप्रवास सुलभ व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. एअर इंडिया एक्सप्रेसकडून यापूर्वी इंदूरच्या विमान सेवेची घोषणा करण्यात आली होती मात्र आता यात आणखीन चार शहरांचा समावेश करण्यात आलाय.

एअर इंडिया कुठे उड्डाण करणार?

एअर इंडिया एक्सप्रेसने मोपा विमानतळावरून थेट विमानसेवा सुरू केल्याने, प्रवाशांना देशातील प्रमुख शहरांमध्ये पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. यामुळे गोव्यातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे. एअर इंडिया एक्सप्रेसकडून गोव्यातील मोपा विमानतळावरून;

  • बंगळुरू

  • चेन्नई

  • दिल्ली

  • इंदूर

  • पाटणा

या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. या घोषणेमुळे गोव्यातील विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mopa Airport flights
Goa Flight: गोव्यातून दीड तासांत इंदूरला जाता येणार; Air India Express ची नवी विमानसेवा, वेळापत्रक, भाडं जाणून घ्या

पूर्वी या भागातील प्रवाशांना दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बराच वेळ लागत होता, मात्र आता मोपा विमानतळामुळे त्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. प्रवाशांना आता या विमानसेवेचे वेळापत्रक आणि तिकिटांची माहिती एअर इंडिया एक्सप्रेसच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

गोवा ते इंदूर थेट विमानसेवा

समोर आलेल्या माहितीनुसार इंदूरच्या आहिल्यादेवी होळकर विमानतळावरुन उत्तर गोव्यातील मनोहर विमानतळाला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सकाळी १०.०५ मिनिटांनी विमान उड्डाण घेईल आणि सकाळी ११.४० वाजता इंदूर येथील आहिल्याबाई होळकर विमानतळावर उतरेल. तसेच, इंदूर या विमानतळावरुन विमान दुपारी १२.१० मिनिटांनी उड्डाण घेईल आणि दुपारी १.४५ मिनिटांनी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल. इंदूर ते गोवा या विमानसेवेसाठी प्राथमिक भाडे ४,५०० रुपये असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Chipi to Navi Mumbai flight starts from August 15
Goa State Pollution Control Board report
All India 40 Plus Senior Cricket League
Goa Dubai Flights
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com