Agriculture Minister Ravi Naik : फोंड्यात कृषी इमारत प्रकल्पाची पायाभरणी

कृषिमंत्री रवी नाईक ः कृषिधन वाढीसाठी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करणार
Ravi Naik
Ravi NaikDAinik gomantak
Published on
Updated on

Agriculture Minister Ravi Naik : फोंड्यात सुसज्ज कृषी इमारत प्रकल्प उभारण्याचे ठरवले होते, हा प्रकल्प आता सुरू होत असल्याने समाधान वाटत असून राज्यातील कृषीधन वाढवण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न होत असून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करू अशी ग्वाही फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.

फोंड्यात काल कृषी कार्यालयाची पायाभरणी रवी नाईक यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला व्यासपीठावर फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आफोन्सो, स्थानिक नगरसेवक ज्योती नाईक, कृषी अधिकारी संतोष गावकर व अभियंता राजेश तानावडे आदी उपस्थित होते.

Ravi Naik
Ponda News - संरक्षण भिंत कोसळून , गॅस पाइपलाइन व 2 वाहनांचे नुकसान | Gomantak TV

नगराध्यक्ष रितेश नाईक म्हणाले की, राज्यात कृषी उद्योगाकडे युवा वर्ग वळत आहे, ही चांगली बाब असून कृषी खात्याच्या माध्यमातून अशा युवकांना प्रोत्साहन मिळायला हवे. कृषी क्षेत्रातील वाढत्या आलेखामुळे राज्य या क्षेत्रात निश्‍चितच स्वयंपूर्ण होईल, अशी आशा रितेश नाईक यांनी व्यक्त केली.

स्वागत व प्रास्ताविक नेव्हिल आफोन्सो यांनी करताना कृषिमंत्री रवी नाईक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या खात्याने अनेकविध योजना आणि उपक्रम चालीस लावले आहेत, त्यामुळे राज्यातील कृषीधन निश्‍चितच वाढेल, अशी आशा व्यक्त केली. संतोष गावकर यांनी आभार मानले.

Ravi Naik
Ponda: फोंड्यात भिंत कोसळून कार आणि दुचाकींचे नुकसान; गॅस पाईपलाईनही तुटली

कृिषमंत्र्यांनी अनुदान वाढवले!

कृषिमंत्री रवी नाईक यांनी हे अनुदान वाढवून शेतकरी व बागायतदारांना दिलासा दिल्याचे या खात्याचे संचालक नेव्हिल आफोन्सो यांनी सांगितले. नारळावरील अनुदान १२ रुपयावरून १५ रुपये, भातशेतीवरील अनुदान २० वरून २२ रुपये करण्यात आले आहे, तर काजूवरील अनुदान १२५ रुपयांवरून १५० रुपये करण्यात आले आहे. शेतकरी व बागायतदारांसाठी विद्यमान अनेक सुविधांतही बदल करून अधिकाधिक लाभ भूमिपुत्रापर्यंत कसा पोचेल, याकडे कृषिमंत्री रवी नाईक यांनी कटाक्ष ठेवल्याचे आफोन्सो यांनी सांगितले.

Ravi Naik
Ponda News : नवीन युवा कलाकार घडवणे हीच शिकांत नागेशकरांना श्रद्धांजली

शेतकरी, बागायतदारांना प्रशिक्षण देणार

रवी नाईक म्हणाले, बदलत्या युगात कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानही बदलत असून शेतकरी व बागायतदारांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी या नूतन इमारतीत तशी योजना करण्यात येणार आहे. राज्यात जमीन पडिक न ठेवता ती लागवडीखाली कशी आणता येईल, याचा विचार व्हायला हवा आणि त्यासाठीच कृषी खात्याने अनेक योजना आणि उपक्रम आखले आहेत. शेतकऱ्यांनी अशा योजना आणि उपक्रमांचा लाभ घेऊन गोवा स्वंयपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com